भारताची कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games) २०२२च्या सातव्या दिवसाची सुरूवात उत्तम झाली. मुरली श्रीशंकरने भारताला ट्रॅक एंड फिल्डमध्ये या स्पर्धेतील दुसरे पदक जिंकून दिले आहे. त्याने पुरूषांच्या लांब उडीत ८.०८ मीटर सर्वोत्तम उडी मारत रौप्य पदक जिंकले आहे. तसेच तो भारतासाठी कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात लांब उडीत रौप्य पदक जिंकणारा पहिलाच पुरूष ऍथलेटिक्स ठरला आहे.
भारताचा कॉमनवेल्थ गेम्समधील ट्रॅक एंड फिल्डचा इतिहास
याआधी भारतीय महिलांनी ट्रॅक एंड फिल्डमध्ये पदकांची कमाई केली आहे. यामध्ये अंजू बॉबी जॉर्ज आणि प्रज्यूषा मलाइक्कल यांचा समावेश आहे. अंजू बॉबी जॉर्जने २००२च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्य पदक जिंकले, तर प्रज्यूषाने २०१०च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य पदक जिंकले. तसेच पुरूषांमध्ये सुरेश बाबूने १९७८च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्य पदक जिंकले होते. मुरली श्रीशंकर (Murali Sreeshankar) याने जिंकलेले रौप्य भारताचे लांब उडीतील दुसरे रौप्य पदक ठरले आहे.
Sreeshankar Murali secures Silver in Mens Long Jump. He missed on Gold by having a lesser second jump.#EkIndiaTeamIndia #WeAreTeamIndia pic.twitter.com/kQpnjBk5Mk
— Team India (@WeAreTeamIndia) August 5, 2022
भारताचे ट्रॅक एंड फिल्डमध्ये दुसरे
श्रीशंकरने जिंकलेले पदक भारताचे बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्सच्या ट्रॅक एंड फिल्डमधील दुसरे पदक आहे. याआधी तेजस्विन शंकरने उंच उडीत कांस्य पदक जिंकले आहे. श्रीशंकरने त्याच्या पहिल्या प्रयत्नात ७.६० मीटर, दुसऱ्या प्रयत्नात ७.८४ मीटर आणि तिसऱ्या प्रयत्नात ७.८४ मीटर लांब उडी मारली आहे. पहिल्या तीन प्रयत्नानंतर श्रीशंकर सहाव्या स्थानावर राहिला.
गोल्ड मेडल जिंकणाऱ्याची केली बरोबरी
श्रीशंकरचा चौथा प्रयत्न अपयशी राहिला. त्याने पाचव्या प्रयत्नात ८.०८ मीटरची उडी मारल्याने तो सहाव्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचला. तर त्याचा सहावा प्रयत्न अपयशी राहिला. या क्रिडाप्रकारात सुवर्ण पदक जिंकणाऱ्या बहामासच्या लकन नैरन याने ८.०८ मीटरचीच लांब उडी मारली. मात्र त्याने हे यश दुसऱ्याच प्रयत्नात मिळवल्याने तो सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. तर श्रीशंकरने पाचव्या प्रयत्नात ते लक्ष्य गाठल्याने त्याचे सुवर्ण थोडक्यात हुकले. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या जोवान वान वूरन याने ८.०६ मीटरच्या उडीसह कांस्य पदक पटकावले.
https://twitter.com/afiindia/status/1555355145201860614?s=20&t=3ZJVkJXqK0J2jGFibDMYlA
सातव्या दिवशी इंडियाचे पहिले पदक
श्रीशंकरने जिंकलेले रौप्य भारताचे सातव्या दिवसातील पहिले पदक ठरले. तर त्यांनतर पॅरा पॉवरलिफ्टर सुधीरने सुवर्ण पदक जिंकले. तसेच भारताचे चार बॉक्सर उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. यामुळे भारताचे चार पदक पक्के आहेत. पुरूषांच्या बॉक्सिंगमध्ये अमित पंघाल, सागर अहलावत रोहित टोकस आणि महिला बॉक्सिंगमध्ये जॅस्मिन या चौघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तसेच या स्पर्धेत भारताचे एकूण सात बॉक्सर उपांत्य फेरीत पोहोचले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हॉकीच्या मॅचदरम्यान खेळाडूंमध्ये रंगली कुस्तीची लढत, मारहाणीचा व्हिडिओ तुफान व्हायरल
भारताला क्रिकेटमधील पहिले मेडल जिंकून देण्याची जबाबदारी ‘या’ रणरागिणींवर, एकटी शानदार फॉर्मात






