---Advertisement---

वेटलिफ्टिंगनंतर आता बॉक्सिंगमध्ये भारताचं नाणं खणकणार, वाचा काय आहेत संधी

On: सोमवार, ऑगस्ट 1, 2022 4:42 PM
nikhat-zareen
---Advertisement---

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी रविवार (३१ जुलै) उत्तम राहिला. भारताने वेटविफ्टिंगमध्ये दोन सुवर्ण पदक जिंकले. त्याचबरोबर बॉक्सर निखत झरीन महिलांच्या ५० किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. तिच्याबरोबरच लवलीना बोरगोहेननही ७० किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. तर शिव थापा आणि सुमित कुंडू हे पदकांच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत.

निखत झरीन (Nikhat Zareen) हीने मोजांबिकच्या हेलेना इस्माइल बागाओला पराभूत करत अंतिम आठमध्ये जागा मिळवली. झरीनने पहिल्या फेरीपासूनच धमाकेदार सुरूवात करत आघाडी घेतली. तिने दोन फेरीतच विजय पक्का केला होता. तर दोन फेऱ्या झाल्यावर पंचांनी सामना लगेच थांबवला. तोवर तिने आघाडी घेतली होती. यामुळे तिला काही नुकसान झाले नाही. नंतर ती आघाडी कायम राखत शेवटच्या फेरीत विजय पक्का करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

पहिल्या फेरीतचे झरीनने विरोधी खेळाडूवर जबरदस्त ठोस्यांचा पाऊस पाडला. शेवटच्या फेरीत तर तिने मारलेला ठोसा इतका ताकदवान होता की, पंचानी सामना संपण्यास ४८ सेंकद बाकी असताना सामना मध्येच थांबवला होता. तसेच झरीनचा पुढील सामना न्यूझीलंडच्या ट्राय गार्टनशी होणार आहे. तिने मागील कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्यपदक जिंकले.

लवलीना उपांत्यपूर्व फेरी दाखल

टोकियो ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती लवलीना बोरगोहेन (Lovlina Borgohain) हिने ७० किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरी प्रवेश केला आहे. तिने न्यूझीलंडच्या एरीन निकोलसनला ५-० असे पराभूत केले. तिचा उपांत्यपूर्व फेरीत सामना २०१८ कॉमनवेल्थ गेम्स ब्रिटनची रौप्य पदक विजेती रोजी इक्केल्सशी होणार आहे.

झरीन आणि लवलीना या दोघींचे हे उपांत्यपूर्व फेरीचे सामने ३ ऑगस्टला होणार आहेत. यामुळे भारताला बॉक्सिंगमधून दोन पदकाच्या आशा आहेत.

थापा, सुमित आणि संजीतची निराशा

भारतीय महिला रिंगमध्ये चमकदार कामगिरी करत असताना दोन पुरूष खेळाडू बाहेर पडले. २०१५चा कांस्य पदक विश्वचॅम्पियन शिव थापा, सुमित कुंडू आणि एशियन हेवीवेट चॅम्पियन संजीत कुमार यांना आपापल्या सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

थापाला स्कॉटलंडच्या रीस लिंचने १-४ पराभूत केले. तर सुमितला ऑस्ट्रेलियाच्या कालम पीटर्सने ५-० असे पराभूत केले. संजीतने पहिले दोन फेरी जिंकत चांगली सुरूवात केली होती. मात्र त्याला सामोआच्या एटो प्लोडझिकी फायोगाली विरूद्ध ३-२ असा पराभव स्विकारावा लागला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

CWG 2022 | कॉमनवेल्थ गेम्समध्ये सायकलस्वारांनी सोडला ट्रॅक, पाहा भीषण अपघाताचा व्हिडिओ

न्यूझीलंड कर्णधाराच्या मनात निवृत्तीचा विचार? दिले स्पष्टीकरण

पहिल्या टी-२० विजयानंतर टीम इंडियाचा विशेष सन्मान, रोहितला मिळाले स्पेशल गिफ्ट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---