सध्या इंग्लंडच्या बर्मिंघम शहरात कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धा खेळली जात आहे. ही स्पर्धा शुक्रवारी (२९ जुलै) सुरू झाली असून स्पर्धेच्या दुसऱ्या दिवस म्हणजेच शनिवार (३० जुलै) भारतासाठी लाभदायक ठरला. शनिवारी भारताच्या पारड्यात दोन पदके आली आहेत. ही दोन्हीही पदके वेटलिफ्टिंग स्पर्धेतील आहे. ६१ किलो वजनी गटात गुरुराज पुजारीने कांस्य पदक पटकावले.
गुरुराज पुजारी (Gururaja Poojary) याने यापूर्वी २०१८ साली पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games) स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकले होते. त्यावेळी त्याने रौप्य पदक जिंकले होते, पण यावर्षी त्याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. गुरुराजने यावेळी २६९ किलो ( स्नॅच प्रकारत ११८ किलो आणि क्लीन एंड जर्क प्रकारात १५१ किलो) एकूण वजनासह तिसरा क्रमांका पटकावला आहे.
Team India wins its second Medal. Congratulations Gururaja Poojary on winning the 🥉 in weightlifting 🏋️♀️ in the 61 KG category. #Ekindiateamindia #B2022 pic.twitter.com/SIWhkyINyQ
— Team India (@WeAreTeamIndia) July 30, 2022
मलेशियाच्या अज्निल बिन बिदिन मोहम्मद याने २८५ किलो (स्नॅच प्रकारत १२७ किलो आणि क्लीन एंड जर्क प्रकारात १५८ किलो) स्कोर साधला आणि सुवर्ण पदक नावावर केले. ही कॉमनवेल्थ गेम्समध्ये केली गेलेली विक्रमी कामगिरी ठरली आहे. पापुआ न्यू गिनीच्या मोरिया बारू याने एकूण २७३ किलो (स्नॅच प्रकारत १२१ किलो आणि क्लीन एंड जर्क प्रकारात १५२ किलो) स्कोर केला आणि रोप्य पदकाचा मानकरी ठरला.
कॉमनवेल्थ गेम्सच्या चालू हंगामात गुरुराज भारताला पदक मिळवून देणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. गुरुराजच्या आधी शनिवारी संकेत सागर याने वेटलिफ्टिंगमध्येच ५५ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले. संकेत मुळचा महाराष्ट्रातील सांगलीचा आहे. त्याने पहिल्या फेरीत स्नॅच प्रकारात ११३ किलो वजन उचलले. तर दुसऱ्या फेरीत क्लीन एंड जर्क प्रकारात १३५ किलोग्राम वजन उचलले. संकेत सुवर्ण पदासाठी दावेदार होता, परंतु स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत त्याला दुखापत झाल्यामुळे रौप्य पदकावर त्याला समाधान मानावे लागले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
CWG 2022: टपरी चालवणाऱ्या बापाचे कष्ट फळले! २१व्या वर्षी मुलाने भारताला मिळवून दिलं पदक
अश्विनने घेतली कार्तिकची फिरकी! म्हटला, ‘एकेकाळी ब्रायन लारासोबत खेळणारा…’
टी २० विश्वचषकातून अश्विनची हाकालपट्टी? भारताच्या दिग्गजाने केलेल्या वक्तव्याने माजवली खळबळ