---Advertisement---

CWG 2022| सुरक्षेच्या कारणास्तव रिकामा केला गेला कुस्ती हॉल; भारतीय कुस्तीपटूच्या बाऊटनंतर…

On: शुक्रवार, ऑगस्ट 5, 2022 5:43 PM
---Advertisement---

इंग्लंडमधील बर्मिंघम शहरात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. स्पर्धेच्या आठव्या दिवशी शुक्रवारी एक दुर्दैवी घटना घडली. ज्यामुळे स्पर्धेचे आयोजकांना आपली मान खाली घालावी लागली. कुस्तीचे सामने सुरू झाले असतानाच पाचव्या सामन्यानंतर छतावरील स्पीकर खाली पडल्याने सर्व स्टेडियम रिकामे केले गेले. सुदैवाने यामध्ये कोणतीही वाईट घटना घडली नाही.

राष्ट्रकुल स्पर्धेतील कुस्तीचा हॉल सेवेंटरी स्टेडियम येथे आहे. आठव्या दिवशीच्या पहिल्या सेशनमधील पाच कुस्त्या झाल्यानंतर अचानक छतावरील स्पीकर मॅटवर पडला. भारताचा ऑलिम्पियन दीपक पुनिया याच्या‌ बाऊटनंतर हा प्रकार घडला. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर तात्काळ सर्व स्टेडियम रिकामे करण्यात आले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी देखील अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यामुळे चाहत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आयोजकांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्वजण सुरक्षित असल्याचे देखील अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. इंग्लंडमधील प्रमाणवेळेनुसार, दुपारी १२.४५ मिनिटांनी सामने पुन्हा एकदा सुरू होतील.

तत्पूर्वी, भारताचा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया व दीपक पुनिया यांनी विजय साजरे करत पुढील फेरीत स्थान मिळवले. भारताचा आशु आणि २०१६ रिओ ऑलिंपिकमध्ये पदक जिंकलेली साक्षी मलिक आजच मॅटवर दिसणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

मियामी बीचवर भारतीय खेळाडू करतायत भलताच एन्जॉय!, पाहा भारतीय ‘तिकडी’चे व्हायरल होणारे फोटो

टी-ट्वेंटी विश्वचषकातील पराभवाचा बदला इंडिया घेणार, खुद्द पाकिस्तानचा खेळाडूच म्हणतोय…

संपुर्ण यादी: कॉमन वेल्थ गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी पटकावलेल्या २० मेडल्सची यादी

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---