शुक्रवारपासून (२८ जुलै) इंग्लंडमधील बर्मिंघम शहरात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडणार आहेत. या स्पर्धेसाठी भारताचे जवळपास ५०० हून अधिक खेळाडू व प्रशिक्षकांचे पथक बर्मिंघममध्ये पोहोचले आहे. सुवर्णपदकाची अपेक्षा असलेला ऑलिंपिक सुवर्णविजेता नीरज चोप्रा दुखापतीमुळे स्पर्धेतून दोन दिवसापूर्वीच बाहेर झाला असताना, आणखी एका प्रमुख खेळाडूच्या बाबतीत चिंता करणारी बातमी बर्मिंघममधून येतेय.
एका आघाडीच्या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, नीरज चोप्राच्या अनुपस्थितीत भारतीय पथकाची ध्वजवाहक म्हणून ओपनिंग सेरेमनीमध्ये सहभागी होणारी दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हीला कोरोना झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बर्मिंघम येथे पोहोचल्यानंतर तिच्या आरटीपीसीआर चाचणीत काहीतरी गडबड असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळेच तिला इतर पथकापासून दूर विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तिचा हा विलगीकरण कालावधी किती दिवस चालणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. मात्र, या सर्व प्रकारात ओपनिंग सेरेमनीमध्ये भारतीय पथकाचे नेतृत्व कोण करणार? याबाबत भारतीय ऑलम्पिक संघटनेकडून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. सिंधूचा दुसरा आरटीपीसीआर अहवाल नकारात्मक आल्यास तिला ओपनिंग सेरेमनीमध्ये सहभागी होण्याची परवानगी देखील दिली जाऊ शकते असे म्हटले जात आहे. असे झाल्यास तीच ध्वजवाहक म्हणून समारंभात सहभागी होईल.
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधील मोठे नाव सिंधू
पीव्ही सिंधू ही सध्या भारतीय बॅडमिंटन मधील सर्वात मोठे नाव आहे. तिने २०१६ रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक तर मागील वर्षी झालेल्या टोकियो ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. तसेच यापूर्वी तिने राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये देखील पदक मिळवले आहे. बर्मिंघम राष्ट्रकुलसाठी भारताच्या बॅडमिंटन संघात १० खेळाडूंचा समावेश केला गेला आहे. यावर्षी कमीत कमी तीन पदके तरी बॅडमिंटन संघ पटकावेल, असा अंदाज वर्तवला जातोय.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधार ‘गब्बर’ ठरतोय माहीपेक्षाही वरचढं?, केलीये ‘या मोठ्या विक्रमाची बरोबरी





