fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

सायकल रिपब्लिक इंडियाकडून मतदार जनजागृतीसाठी सायकल रॅलीचे आयोजन

निगडी, पुणे । सायकल रिपब्लिक इंडिया तसेच बर्गोमॉंन्ट इंडिया यांच्या तर्फे मतदान जागृतीसाठी भारत भरात टप्प्याटप्याने आयोजन करण्यात आले आहे. यासाठी त्यांनी देशातील विविध भागात सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. याला सायकलस्वार उत्स्फुर्त प्रतिसाद देत आहेत.

या देशभरातील रॅलीचा एक भाग म्हणून आज पार पडलेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी जलतरण तलाव निगडी प्राधिकरण ते किवळे तसेच वाल्हेकरवाडी, संभाजी चौक, भेळ चौक अशा प्राधिकरणाच्या पेठेतून सायकल फेरी काढण्यात आली.

सायकल फेरी दरम्यान श्री. संदिप खोत , मतदार नोंदणी अधिकारी, पिंपरी यांनी मतदानाविषयी जागृती केली. यावेळी रोटरी क्लब पिंपरीचे विजय नाईक यांनी सहभागी सायकलस्वारांना मार्गदर्शन केले.

सदर सायकल रॅलीमध्ये निगडी, पुणे, चिंचवड परिसरातील नागरिकांनी तसेच दुरपल्ल्याचे सायकलस्वार आदित्य पांढरे, संजय ढवळे, प्रतिभा ढाकणे, दिगंबर पाटील यांनी भाग घेतला. अभिजीत कुपटे यांनी नियोजन केले.

You might also like