प्रो कबड्डीचे पाचवे पर्व पुढील आठवड्यात सुरु होणार आहे. सर्वांना उत्सुकता लागली आहे की कोण होणार या पर्वाचा विजेता? मागील दोनही मोसमात पाटणा पायरेट्सने प्रो कबड्डीचा चषक जिंकला आहे.
दरवर्षी मुंबईला आपल्या चाहत्यांकडून बरेच प्रोत्साहन मिळते आणि हे फक्त मैदानावरच नाही तर सोशल मीडियावरही आहे. अनुप कुमार आणि मुंबईच्या लोकप्रियतेमुळे सोशल मीडियावर यु मुंबाचा बोलबाला आहे. तरीही मुंबई फेसबुकवर मुंबईचा दबदबा जरा कमीच आहे.
पाहुयात कोण आहे फेसबुकचा राजा.
क्रमवारी (फेसबुक फॉलोवर्स):-
१. दबंग दिल्ली – १०,१०,०००
२. पुणेरी पलटण – ६,७४,४५५
३. यु मुंबा – ६,२२,०००
४. जयपूर पिंक पँथर्स – ५,९६,९४२
५. बंगाल वोरीयर्स – ५,०६,०३४
६. तेलगू टायटन्स – ४,२५,७७०
७. बंगळुरू बुल्स – ३,६०,३४९
८. पाटणा पायरेट्स – २,७४,९६७
९. हरियाणा – ४२,६६९
१०. गुजरात – ९०००
११. तामिल थलइवा – ५,०००
१२. उत्तर प्रदेश – ३३२
प्रो कबड्डीच्या ऑफिशियल फेसबुक पेजला ९ लाखहुन अधिक लाईक्स आहेत. विशेष म्हणजे याच लीगमधील एक संघ असूनही दबंग दिल्ली संघाला प्रो कबड्डीच्या अधिकृत फेसबुक पेजपेक्षा जास्त लाइक्स आहेत.
हरियाणा, तामिळ, उत्तर परदेश आणि गुजरात या संघाना कमी फॉलव्हर्स आहेत कारण हे संघ याच वर्षीच प्रो कबड्डीमध्ये सामील झाले आहेत. पाटणा पायरेट्स हा संघ फक्त चांगला खेळ करण्यात लक्ष केंद्रित करत आहे त्यामुळेच त्याच्या फेसबुक पेजला जुन्या संघाच्या तुलनेत सर्वात कमी लाईक्स आहेत. मुंबई आणि पुण्यामधील चुरस येथे ही दिसून येते पण विशेष म्हणजे पुण्याच्या संघाला मुबईच्या संघापेक्षा फेसबुक पेजवर जास्त लाईक्स आहेत.