प्रो कबड्डी लीग २०२१ला काही दिवसांपूर्वीच धमाक्यात सुरुवात झाली आहे. प्रो कबड्डीचा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या पंधराव्या दिवशीचा (०५ जानेवारी) दुसरा सामना ‘दबंग दिल्ली’ आणि ‘तेलुगू टायटन्स’ संघात झाला. या सामन्यात उभय संघांमध्ये शेवटपर्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळाली.
पहिल्या हाफपर्यंत दोन्ही संघ १८-१८ ने बरोबरीवर होते. शेवटपर्यंत धाकधूक वाढवलेल्या या सामन्यात अखेर दबंग दिल्लीने बाजी मारली. फक्त १ अंकाने म्हणजेच ३६-३५ च्या फरकाने त्यांनी हा सामना खिशात घातला.
NOT OUR DAY#SuperhitPanga #vivoprokabaddiisBack pic.twitter.com/2PKNcwqzKL
— Telugu Titans (@Telugu_Titans) January 5, 2022
पहिल्या हाफमध्ये अशी होती सामन्याची स्थिती
तत्पूर्वी पुणेरी पलटन विरुद्ध गुजरात जायंट्स संघात झालेल्या सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये पुण्याचा संघ ६ अंकानी पुढे होता. त्यांनी पहिल्या हाफमध्ये १९-१३ च्या फरकाने आघाडी घेतली होती. पुढे हीच आघाडी कायम ठेवत त्यांनी ७ अंकांनी सामन्यात बाजी मारली आहे. पुणेरी पलटनने ३३-२६ च्या अंतराने हा सामना जिंकला आहे. हा त्यांचा हंगामातील दुसरा विजय होता.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: अवघ्या २ सेकंदात बदलला अंपायरने निर्णय आणि तंबूत परतला अजिंक्य रहाणे
हेही पाहा-





