भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे आयोजण्यात येणारी (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटर स्पर्धांपैकी एक मानली जाते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जगभरातील खेळाडू खूप उत्सुक असतात. कारण या लीगमधून खेळाडूंना प्रसिद्धी आणि भरपूर मानधन मिळते. परंतु आयपीएलबद्दल असे अनेक सत्य आहेत, जे लोकांसमोर आल्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता.
चीअरलीडरने मोठे खुलासे केले
आयपीएल 2011 च्या हंगामा दरम्यान गॅब्रिएला पास्क्युलोटो नावाच्या चीअरलीडरला जवळजवळ प्रत्येक क्रिकेटप्रेमी ओळखू लागले होते. दक्षिण आफ्रिकेची रहिवासी असलेली गॅब्रिएला त्या हंगामात मुंबई इंडियन्सची चीअरलीडर होती. परंतु हंगामातील तिच्या वाईट अनुभवांबद्दल ब्लॉगवर लिहून पोस्ट करत तिने परिस्थिती सगळ्यांसमोर व्यक्त केली होती. गॅब्रिएला हिने आयपीएल पार्टींशी संबंधित अनेक मोठ्या गोष्टी उघडकीस आणल्या होत्या. तिने असा आरोप केला होता की, या पार्ट्यांमध्ये चीअरलीडर खेळाडू आणि इतर पाहुण्यांना वेश्यासारखे वाटू लागतात.
सचिन आणि धोनीचे केले कौतुक
त्याचबरोबर धोनी आणि सचिनबद्दलही तिने खुलासा केला की, तिने भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला नम्र असल्याचे सांगितले. तर सचिन तेंडुलकर हा आयपीएलच्या पार्टींमध्ये खूप कमी वेळा दिसला, असे म्हणत तिने मास्टर ब्लास्टरचेही कौतुक केले होते. गॅब्रिएलाच्या मते, सचिन आणि धोनीचे चरित्र खरोखरच खूपच चांगले आहे.
मात्र तिच्या या आरोपांमुळे आयपीएल पार्टींमधील अश्लीलता सर्वांसमोर आली होती आणि त्यामुळेच बरेच दिवस सर्वत्र हा गोंधळ उडाला होता. नंतर या पार्टींची संख्यादेखील कमी झाली.
आयपीएलचे उर्वरित सामने युएईत
जवळपास दोन वर्षांनंतर यावर्षी भारतात पुन्हा आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. पण भारतात कोरोनाच्या दुसर्या लाटेने गोंधळ उडाला. त्यानंतर आयपीएलला मधेच स्थगिती देण्यात आली होती. या मोठ्या लीगच्या बायो-बबलमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आणि खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. आता अखेर सप्टेंबर महिन्यात युएईमध्ये पुन्हा एकदा ही लीग सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नवीकोरी विंटेज कार अन् जिवाभावाच्या मित्रांसंगे जेवणावर ताव, ‘माही’चा तो फोटो भन्नाट व्हायरल
क्या बात! इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या वनडेत आझमचे ‘विश्वविक्रमी’ शतक, कोहली-वॉर्नरलाही सोडले मागे