भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली ‘प्रिंस ऑफ कोलकाता’, ‘दादा’ या नावांनी क्रिकेट जगतात प्रसिद्ध आहे. परंतु कोलकातामधील लोकांच्या मनावर तो ‘महाराजा’च्या रूपात राज्य करतो. बुधवारी (८ जुलै) गांगुलीने वयाची ४८ वर्षे पूर्ण केली आहेत.
गांगुलीच्या (Sourav Ganguly) फेसबुक फॅन क्लबच्या (Maharajer Dorbare) सदस्यांनी खास अंदाजात आपल्या ‘महाराजा’चा वाढदिवस करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान फॅन क्लबकडून गांगुलीचा फोटो असलेला मास्क जारी करण्यात आला आहे.
अशाप्रकारच्या मास्कला ‘दादनिर्भर मास्क’ असे नाव देण्यात आले आहे. गांगुलीचे २ फोटो त्याच्या आयुष्याशी संबंधित २ महत्त्त्वाचे क्षण दर्शवतात. त्या २ फोटोंपैकी एक फोटो हा १९९६ मध्ये लॉर्ड्स येथे कसोटी पदार्पणाचा आहे, तर दुसरा फोटो हा त्याच्या बीसीसीआयचा अध्यक्ष पदाशी निगडीत आहे.
#SouravGanguly #8july #happybirthday..
"DADANIRVOR" mask! #CoronavirusIndia #covid2020 what a celeb protection mask! #maharajerdarbare fan club with the collaboration @pinnacleenterprise @SGanguly99 @DonaGanguly75 @sachin_rt @RaviShastriOfc @ANI @PTI_News @imVkohli pic.twitter.com/pkApz5Co6m— DG Talk (@DGTalk2) July 1, 2020
हा खास मास्क कॉटनच्या २ थरांनी बनले आहेत. हे मास्क सहजरीत्या धुतले जाऊ शकतात. फॅन क्लबचे ऍडमिन मानश चॅटर्जी (Manash Chatterjee) म्हणाले, “दादा आमच्यासाठी प्रेरणा आहे. त्याने कोरोना काळात तांदळाचे वाटप केले होते. तो टॉलिगंज फिल्म इंडस्ट्रीमधील कर्मचार्यांच्या मदतीसाठी पुढे आला होता.”
ऍडमिन चॅटर्जीने पुढे म्हटले, या मास्कची किंमत ९६ रूपये ठेवण्यात आली आहे. यातून जमा झालेला निधी सामाजिक कामांमध्ये वापरण्यात येणार आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-जेव्हा एका वनडे सामन्यात ४ क्रिकेटर जेव्हा करतात शतक, भारताच्या या खेळाडूंनी देखील..
-अवघ्या काही दिवसांनी हुकली होती सचिनची गावसकरांसोबत खेळण्याची संधी
-कोरोनाचा फटका बसणार या ३ क्रिकेटरला, कमबॅक राहणार केवळ एक स्वप्न