आयपीएल २०२१ मध्ये सनरायझर्स हैदराबादचे प्रदर्शन काही खास राहिलेले नाही. हैदराबादने हंगामात खेळलेल्या १४ सामन्यांपैकी केवळ ३ सामने जिंकले आणि संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर होता. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू डेविड वार्नर हंगामाच्या सुरुवातीला हैदराबादच्या कर्णधाराच्या रूपात संघात सामील झाला होता. पण त्यानंतर संघाच्या सततच्या खराब प्रदर्शनामुळे त्याला कर्णधारपदावरून पायउतार करण्यात आले. यानंतर त्याला बऱ्याच सामन्यात प्लेइंग इलेव्हनमधूनही वगळण्यात आले. आता हैदराबादने हंगामाचा शेवट झाल्यानंतर चाहत्यांचे आभार मानणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओत वार्नर दिसलाच नाही.
संघाच्या निरोपाच्या व्हिडिओतही वार्नर दिसत नासल्यामुळे चाहते संतापले आहेत. यानंतर वार्नरने चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे आणि आपण व्हिडिओत न दिसण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. हैदराबादच्या सततच्या खराब प्रदर्शनामुळे वार्नरला कर्णधारपद काढून टाकण्यात आले आणि त्यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली नाही. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात वार्नर फक्त दोन सामन्यात खेळताना दिसला. हैदराबादने शेवटच्या काही सामन्यांमध्ये वार्नरला प्रथम ११ खेळाडूंमध्येही संधी दिली नव्हती.
हैदराबादने वार्नरला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करण्यासोबतच त्यांच्या फेअरवेल व्हिडिओतूनही बाहेर केले आहे. संघाने त्यांच्या इंस्टाग्राम खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत कर्णधार केन विलियम्सन, मुख्य प्रशिक्षक ट्रेवर बेलिस सहित इतरही खेळाडू दिसत आहेत. व्हिडिओत खेळाडू त्यांचे समर्थन करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानत आहेत. असे असले तरी, व्हिडिओत वार्नर दिसला नाही आणि याच कारणास्तव चाहत्यांनी कमेंट्समध्ये वार्नरविषयी प्रश्न उपस्थित केले होते.
https://www.instagram.com/tv/CUzL6tnF5n9/?utm_source=ig_web_button_share_sheet
या सर्व प्रकारानंतर चाहत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नला स्वत: वार्नरने उत्तर दिले आहे. त्याने व्हिडिओत न दिसण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. त्याला व्हिडिओत सामील होण्यासाठी सांगितले नव्हते, असे वार्नरने सांगितले आहे. वार्नर कमेंटमध्ये म्हटला आहे की, “नाही, मला असे करण्यासाठी सांगितलेच गेले नव्हते.” असे असूनही एका अन्य कमेंटमध्ये वार्नरने हैदराबादच्या चाहत्यांना संघाचे समर्थन करत राहण्यासाठी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सलग २ पराभवांमुळे चिंतेत असलेल्या सीएसकेला तगडा झटका, दिल्लीविरुद्ध ‘या’ धुरंधराचे खेळणे अनिश्चित
टी२० विश्वचषकासाठी अफगाणिस्तान संघाला लाभणार ‘या’ दिग्गजाचे मार्गदर्शन, इंग्लंडला बनवलेय विश्वविजेता
रवी शास्त्रींनंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक कोण? ‘या’ नव्या परदेशी दिग्गजाचे नाव चर्चेत