विराट कोहलीने टी २० चे कर्णधारपद सोडल्याची घोषणा झाल्यापासून भारतीय संघाचा पुढचा कर्णधार कोण असेल याबाबत बरीच चर्चा सुरू झाली आहे. रोहित शर्माचे नाव या यादीत आघाडीवर आहे, तर काही क्रिकेट पंडित केएल राहुलकडे टी२०चे कर्णधारपद सोपवण्याच्या बाजूने आहेत. आयपीएल २०२१ मध्ये रिषभ पंतचे शानदार कर्णधारपद पाहिल्यानंतर त्याच्या नावाचीही सध्या चर्चा होत आहे आणि त्याला उपकर्णधाराची जबाबदारी दिली जाऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने विराट कोहली नंतर भारतीय संघाच्या पुढील कर्णधाराची नावे दिली आहेत.
स्टेनच्या मते, कोहलीनंतर रोहित शर्माला भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात यावे. एका वाहिनीशी बोलताना तो म्हणाला,’ कर्णधार निवडण्यासाठी त्यांच्याकडे बरीच नावे आहेत. मला वाटते की सध्या भारतीय संघासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मोहम्मद सिराज आणि रिषभ पंत सारख्या युवा खेळाडूंचे फॉर्मात असणे. हे युवा खेळाडू सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार खेळ दाखवत आहेत. त्यामुळे जर कर्णधारपद रोहितला दिले, तर ते अधिक योग्य ठरेल.’
‘कारण, रोहित त्यांच्यासोबत बराच काळ राहिला आहे आणि त्याने पाच वेळा आयपीएल चषक देखील जिंकला आहे. त्यामुळे हा एक चांगला निर्णय असेल, याशिवाय त्याला तरुण खेळाडूंना कसे तयार करावे हे माहित आहे. म्हणून रोहित शर्मा योग्य पर्याय ठरेल,’ असेही स्टेन म्हणाला.
स्टेन पुढे म्हणाला, ‘तुम्ही आयपीएलमध्ये पाहा, किती खेळाडू आहेत भारताकडे. सूर्यकुमार आहे, मला वाटते की तो येत्या काळात मोठी भूमिका बजावू शकतात. रिषभ पंत आहे, जो सध्या खूप चांगला खेळत आहे. श्रेयस अय्यर आणि रोहितही आहेत. हे सर्वजण ही जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडू शकतात. परंतु भारतीय संघाला कोणाकडे तरी कर्णधारपदाची जबाबदारी सोपवावी लागेल आणि त्याला मुक्तपणे संघ चालवण्याची परवानगीही द्यावी लागेल. भारताने बराच काळ एका खेळाडूला कर्णधारपद दिले होते आणि त्याने आपले काम चोख बजावले आहे.’
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल खेळणाऱ्या सर्व खेळाडूंनी सोडला सुटकेचा निश्वास; ‘या’ प्रमुख नियमात मिळाली सूट
खुर्रम मंजूरने वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीची घेतली शाळा, एकाच षटकात ठोकले ५ चौकार
‘हिटमॅन’ची बिघडली लय; अवघ्या ७ धावांवर विकेट देत ‘या’ लाजिरवाण्या विक्रमात रोहितची सरशी