एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाला जवळपास एक वर्ष बाकी असताना दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला, दक्षिण अाफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजी फळीची चिंता सतावत आहे.
डेल स्टनेच्या मते दक्षिण आफ्रिकेकडे सर्वोत्तम युवा वेगवान गोलंदाज आहेत. मात्र त्यांच्याकडे अनुभव कमी असल्याचे मत एका कार्यक्रमात बोलताना त्याने व्यक्त केले.
“आमच्या संघात सध्या युवा वेगवान गोलंदाज आहेत. ते प्रभावी आहेत मात्र त्यांच्याकडे अनुभवाची कमतरता आहे. जर आम्ही अननुभवी गोलंदाजांसोबत विश्वचषक खेळायला गेलो तर आम्हाला त्याचा नक्कीच फटका बसेल.” असे स्टेन म्हणाला.
पुढे त्याने कागिसो रबाडा आणि लुंगीसानी एन्गिडी कौतुक करत त्यांना मार्गदर्शन करण्याची इच्छाही व्यक्त केली.
“आमच्या संघातील युवा गोलंदाज कगिसो रबाडा आणि लुंगीसानी एन्गिडी गेल्या काही दिवसांपासून चांगली कामगिरी करत आहेत. मात्र त्यांच्याकडे अनुभव कमी आहे. त्यामुळे मी त्यांच्यासोबत खेळून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उत्सुक आहे.”
“२३ वर्षीय रबाडाकडे खूप कौशल्य आहे. मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीत जे काही मिळवले आहे ते मिळवण्याची क्षमता रबाडाकडे देखील आहे.” असे डेल स्टेन म्हणाला.
गेल्या काही दिवसापूर्वीच डेल स्टेन २०१९ च्या विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-कपिल देव शतकात एकदाच जन्माला येतो