---Advertisement---

डोळ्याचे पाते लवते न लवते इतक्यात डॅनियलचा ‘रॉकेट कॅच’, फलंदाजाच्याही उंचावल्या भुवया- VIDEO

On: गुरूवार, ऑक्टोबर 7, 2021 9:46 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगचा ५२ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात आरसीबीला हैदराबादकडून अवघ्या ४ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. या सामन्यात दोन्ही संघाच्या गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. या सामन्यात आरसीबीच्या अष्टपैलू डॅनियल ख्रिश्चनने चमकदार कामगिरी करत ३ षटकांत फक्त १४ धावा देत २ बळी घेतले. यादरम्यान त्याने हैदराबादचा धोकादायक फलंदाज जेसन रॉयचा अद्भुत झेल पकडत आरसीबीला मोठा दिलासा मिळवून दिला होता.

आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने हैदराबादच्या डावाचे १५ वे षटक टाकण्याची जबाबदारी ख्रिश्चनला दिली आणि त्याने त्या षटकात प्रथम प्रियम गर्ग आणि नंतर शेवटच्या चेंडूवर रॉयला झेलबाद केले. रॉयने ख्रिश्चनचा ‘स्लो बॉल’ अतिशय वेगाने थेट समोर टोलावला. ख्रिश्चनच्या जागी दुसरा गोलंदाज असता तर त्याने हा वेग पाहून हात सुद्धा घातला नसता, पण एकप्रकारे त्याने आपला हात आगीत टाकण्याचे काम केले आणि चेंडू त्याच्या हातात अक्षरशः फेविकॉलप्रमाणे चिटकला. ख्रिश्चनचा हा झेल पाहून रॉयसुद्धा अचंबित झाला होता.

या सामन्यात नाणेफेक जिंकत आरसीबीने प्रथम गोलंदाजी निवडली. त्यामुळे हैद्राबादचा संघ प्रथम फलंदाजीला मैदानात उतरला होता. पण संघाकडून अतिशय सुमार फलंदाजी पाहायला मिळाली. केवळ कर्णधार केन विल्यमसन (३१) आणि जेसन रॉयच्या (४४) यांच्या भागिदारीच्या जोरावर हैद्राबादने १४१ धावांपर्यंत मजल मारली. या दोघांशिवाय होल्डर (१६), प्रियम गर्ग (१५) आणि अभिषेक शर्मासह (१३) तर रिद्धीमान साहाने १० धावा केल्या. आरसीबीकडून हर्षल पटेलने पुन्हा चमकदार कामगिरी करत ३ विकेट्स मिळवल्या.

डॅनियल क्रिस्टियनने २ आणि चहल, गार्टन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. आरसीबीने हैद्राबाद संघाला १४१ धावांवर रोखलं. ज्यामुळे आरसीबीसमोर १४२ धावांचेच लक्ष्य होते. पण हे लक्ष्य त्यांना निर्धारीत २० षटकांत पूर्ण करता न आल्याने अखेर आरसीबीचा संघ पराभूत झाला.

महत्त्वाच्या बातम्या-

सीएसकेच्या ताफ्यात रोहित शर्माच्या भिडूची एन्ट्री, घेणार दुखापग्रस्त सॅमची जागा; वाचा त्याच्याबद्दल

अवघ्या दुसऱ्या सामन्यात ‘काश्मिरी बॉय’ने रचला इतिहास, बनला आयपीएल २०२१चा ‘नवा स्पीडस्टार’

वयाची तिशी ओलांडल्यानंतरही हर्षलचा दरारा कायम! ‘या’ बड्या विक्रमात चेन्नई, मुंबईकरांवरही ठरलाय सरस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---