---Advertisement---

“फायनल खेळण्यासाठी कोणी उत्सुक आहे का? फ्री बियर, मोठा कप मिळेल”, ऑसी क्रिकेटरने का केलं असं ट्वीट, वाचा

Dan Christian
---Advertisement---

शुक्रवारी (२८ जानेवारी ) बिग बॅश लीग २०२२ स्पर्धेचा (big bash league) अंतिम सामना पार पडणार आहे. या स्पर्धेत सिडनी सिक्सर्स (Sidney sixers) संघाने उपांत्य फेरीत विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. परंतु, अंतिम सामना खेळण्यासाठी या संघाकडे ११ फिट आणि कोविड फ्री खेळाडू नाहीये. त्यामुळे या संघातील खेळाडू डॅनियल ख्रिश्चनने (Daniel Christian) ट्विट करत सहक्रिकेटपटूंना संघात समाविष्ट होण्याची विनंती केली आहे. यासह एक हटके ऑफर देखील दिली आहे. ज्यावर एबी डिविलियर्स (Ab devilliers) आणि जोफ्रा आर्चर (Jofra archer) सारख्या खेळाडूंनी देखील मजेशीर प्रतिक्रीया दिली आहे.

डॅनियल ख्रिश्चनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत लिहिले की, “मेलबर्नमध्ये कोणालाही म्हणा जे उद्या (२८ जानेवारी) संध्याकाळी क्रिकेट सामना खेळण्यास इच्छुक आहेत. आमचा संघ ११ कोविड मुक्त आणि फिट खेळाडूंना मैदानात आणण्यासाठी संघर्ष करत आहे. मार्वल स्टेडियममध्ये संध्याकाळी ६:३० नंतर सराव सुरू होईल. त्यानंतर मोफत बिअर आणि शक्यतो मोठा कप मिळेल. जर तुम्ही इच्छुक असाल तर मेसेज करा. कसोटी क्रिकेटपटू चालणार नाही.”

या ट्विटला प्रतिसाद देत एबी डिविलियर्सने लिहिले की, “मी तर उत्सुक आहे, पण तुम्ही माझ्या ४ षटकांची हमी घेऊ शकता का?” तर इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने ट्विट करत लिहिले की, “मला त्याची किंमत मोजावी लागेल का?” डॅनियल ख्रिश्चनने केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सिडनी सिक्सर्स संघातील खेळाडू कोविडमुळे पूर्णपणे फिट नाहीये. त्यामुळे या संघाला प्लेइंग ईलेव्हेनमध्ये खेळण्यासाठी खेळाडूंची कमतरता जाणवू लागली आहे. हेच कारण होते की, उपांत्यफेरीच्या सामन्यात सहाय्यक प्रशिक्षकाला मैदानात येऊन यष्टिरक्षण करावे लागले होते. बिग बॅश लीग २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना पर्थ स्कॉर्चर्स आणि सिडनी सिक्सर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

देने वाला जब भी देता है…! आधी आयपीएलच्या नव्या संघात संधी अन् आता भारतीय संघातही निवड

वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी रोहित, अक्षरचे पुनरागमन, तर ‘या’ युवा खेळाडूंना १८ जणांच्या संघात संधी

हे नक्की पाहा :

आणि विराट कोहलीला धरावे लागले सचिनचे पाय । Virat Touched Sachin's Feet

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---