मुंबई । इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल ही जगातील सर्वात मोठे क्रिकेट लीग मानली जाते. जगभरातील अनेक खेळाडू या क्रिकेट लीगमध्ये खेळण्यास उत्सुक असतात. मात्र; कोरोना व्हायरसमुळे ही यावर्षीचा आयपीएल मोसम सध्या अनिश्चित काळासाठी स्थगित आला आहे. या लीगमध्ये आता महिला खेळाडू देखील खेळण्यास उत्सुक असल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वॅटने आयपीएलमध्ये खेळू इच्छित असल्याची प्रतिक्रिया नुकतीच दिली आहे. तिला आयपीएलमध्ये कोणत्या संघाकडून खेळायला आवडेल असा प्रश्न विचारला होता. त्यावर cricket.comशी बोलताना डॅनियल वॅटने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघात खेळण्यास इच्छुक असल्याचे सांगितले.
ती म्हणाली, “मी आरसीबीच्या संघाला सपोर्ट करेन. कारण या संघात विराट कोहली, मोईन अली, युजवेंद्र चहल आणि एबी डिव्हिलर्स सारखे धुरंधर खेळाडू आहेत. मी त्यांच्यासाठी या संघाकडून खेळेल.”
युजवेंद्र चहल विषयी बोलताना ती म्हणाली की, ” मी युजवेंद्र चहलला कधीच भेटले नाही. पण सोशल मीडियावर त्याची पोस्ट पाहत असते. तो चांगला गोलंदाज आहे. आम्ही इन्स्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करतो.”
याआधी वॅटने सचिन तेंडुलकरच्या आठवणींविषयी सांगतले होते की, ” दहा वर्षांपूर्वी लॉर्डसच्या मैदानावर सचिन आणि अर्जुन आले होते. मी त्यांच्याजवळ गेले आणि माझी माझा परिचय करून दिला. अर्जुन त्यावेळी खूपच लहान होता. त्या दिवशी मी त्याला गोलंदाजी केली. गुगलवर याचे काही फोटो देखील आहेत. सचिन तेंडुलकर अर्जुन यापैकी कोणीही लॉर्डसच्या मैदानावर आले तर मी त्यांना भेटायला जाते.”
यदाकदाचित आपल्याला माहित नसेल तर…
डॅनियल वॅट ही इंग्लिश क्रिकेटर असून या २९ वर्षीय खेळाडूने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण २०१० साली भारताविरुद्ध मुंबई शहरात केले आहे. या अष्टपैलू खेळाडूने इंग्लंड कडून ७४ वनडे आणि १०९ टी२० सामने खेळले आहेत.
अतिशय प्रतिभावान क्रिकेटपटू असलेल्या वॅटने ४ एप्रिल २०१४ रोजी विराटला लग्नाची मागणी घातली होती. हे दोनही खेळाडू चांगले मित्र आहेत. २०१४ मध्ये जेव्हा भारताने इंग्लंडचा दौरा केला तेव्हा डॅनियल वॅट आणि विराट कोहली भेटले होते. तेव्हा विराटने तिला स्वतःची बॅट गिफ्ट केली होती.
Kholi marry me!!!
— Danielle Wyatt (@Danni_Wyatt) April 4, 2014
Back training this week. Can't wait to use this beast 👌🏽💪🏽🔥 Thanks @imVkohli #ping #middlesbiggerthanme 🏏 pic.twitter.com/BknGjYx2Yj
— Danielle Wyatt (@Danni_Wyatt) September 10, 2017
वॅटने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ शतकांसह २५०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तसेच ७० पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
“मला पण रोहित शर्मासारखी फलंदाजी करायची आहे”
सौरव गांगुलीच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण; वहिनीचा अहवाल पॉझिटिव्ह
२०११ च्या विश्वचषकातील अंतिम सामना फिक्स? श्रीलंकेने सुरु केली चौकशी