अमेरिकन ओपन स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (१२ सप्टेंबर) उशिरा रात्रीपर्यंत न्यूयॉर्कमध्ये पार पडला. या स्पर्धेतील अंतिम लढत टेनिस विश्वातील दोन दिग्गज टेनिपटूंमध्ये पार पडली. अंतिम सामन्यात सर्बियाचा खेळाडू नोवाक जोकोविच आणि रुसचा दानील मेदवेदेव हे दोघे आमने सामने होते. या अंतिम लढतीत दानील मेदवेदेवने अप्रतिम खेळी करत इतिहासाला गवसणी घातली आहे.
हा सामना सुरू होण्यापूर्वी नोवाक जोकोविचला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु दानील मेदवेदेवने अप्रतिम खेळी करत नोवाक जोकोविचला अंतिम सामन्यात पराभूत केले आणि अमेरिकन ओपनच्या जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. अमेरिकन ओपन स्पर्धेच्या १४ वर्षांच्या इतिहासात तो जेतेपद पटकावणारा ९ वा खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे या पराभवामुळे जोकोविचचे कॅलेंडर ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी हुकली आहे.
सामन्याचा सुरुवातीपासूनच दानील मेदवेदेवने नोवाक जोकोविचला पूर्णपणे बॅकफूटवर ठेवले होते. त्यामुळे नोवाक जोकोविचवर दबाव वाढत गेला होता. दानील मेदवेदेवन जोकोविचला ६-४, ६-४, ६-४ ने पराभूत करत इतिहास रचला. तब्बल अडीच तास सुरू असलेल्या या सामन्यात दानील मेदवेदेवने जोकोविचला सामन्यात पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. जेव्हा सामना समाप्त झाला, त्यावेळी दानील मेदवेदेव इतका थकला होता की, तो थेट मैदानातच झोपला.
😝 @DaniilMedwed pic.twitter.com/VlqihQ7hSY
— US Open Tennis (@usopen) September 12, 2021
"To me you are the greatest tennis player in history." pic.twitter.com/DZMH7MDr4N
— US Open Tennis (@usopen) September 12, 2021
All love for the legend, @DjokerNole 👏 pic.twitter.com/g2JE8fCVM4
— US Open Tennis (@usopen) September 12, 2021
हा ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर दानील मेदवेदेवने म्हटले की, “सर्वप्रथम तर मी तुमची आणि तुमच्या चाहत्यांची माफी मागतो. सर्वांना माहीत आहे आज काय झालं ते. तुम्ही यावर्षी आणि आपल्या कारकीर्दीत भरपूर काही मिळवले आहे. मी यापूर्वी हे कधीच म्हटले नाही. माझ्यासाठी तुम्ही इतिहासातील (नोवाक जोकोविच) सर्वात महान टेनिसपटू आहात.”(Danill Medvedev beats Novak Djokovic in the us open finals)
Champion status 🏆 pic.twitter.com/dMbePkgano
— US Open Tennis (@usopen) September 12, 2021
या सामन्याच्या सुरुवातीपासूनच जोकोविच दबावात असल्याचे दिसून आले होते. सामना गमावल्यानंतर जोकोविच देखील भावूक झाला होता. तो अश्रू पुसत दानील मेदवेदेवसाठी टाळ्या वाजवत होता. हा सामना झाल्यानंतर जोकोविचने चाहत्यांना म्हटले की, “मी खूप भाग्यवान व्यक्ती आहे. कारण तुम्ही लोकांनी मला कोर्टात खूप खास असल्याचा भास करून दिला. यापूर्वी न्यूयॉर्कमध्ये असे कधीच वाटले नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
जोकोविचला ‘कॅलेंडर ग्रँडस्लॅम’ जिंकण्याची संधी, पण नक्की हे आहे तरी काय? घ्या जाणून
वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी एमाचे घवघवीत यश, यूएस ओपनचे जेतेपद पटकावत रचला इतिहास
सर्वात मोठा इतिहास रचण्यापासून जोकोविच केवळ एक पाऊल दूर, फायनलमध्ये मेदवेदेवशी होणार टक्कर