---Advertisement---

विश्वास बसणार नाही; टीम इंडियात पडलेत दोन गट? ‘विराट आणि राहुल जवळही बसत नाही’

On: शुक्रवार, जानेवारी 21, 2022 4:13 PM
Virat-Kohli-KL-Rahul
---Advertisement---

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या कर्णधारपदावरून बरेच विवाद सुरू आहेत. विराट कोहलीनंतर रोहित शर्माच्या हाती मर्यादित षटकांच्या संघांची सूत्रे देण्यात आली आहेत. परंतु दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. अशात केएल राहुल (KL Rahul) वनडे मालिकेत संघाचे नेतृत्त्व करतो आहे. मात्र त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिलाच वनडे सामना (First ODI Match) ३१ धावांनी गमवावा लागला आहे. यानंतर आता पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कानेरिया (Danish Kaneria) याने वादग्रस्त दावा केला आहे.

पहिल्या वनडे सामन्यादरम्यान भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये दोन गट (Indian Dressing Room Divided Into Two Groups) पडल्याचे दिसले असल्याचा दावा कानेरियाने केला आहे. तो आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलत होता.

व्हिडिओ पाहा- अभ्यासू कीडा असलेला Axar Patel फक्त आज्जीमुळे बनला क्रिकेटर

कानेरियाने म्हटले आहे की, आम्ही सामन्यादरम्यान पाहिले की, भारताचे ड्रेसिंग रूम २ गटांमध्ये विभागले गेले आहे. केएल राहुल आणि विराट कोहली (Virat Kohli) एकमेकांपासून दूर बसले (Rahul And Kohli Sitting Apart) होते. तसेच कोहली तशा मूडमध्ये दिसला नाही, जसा तो कर्णधार असताना दिसत असायचा. पण मला माहिती आहे, तो संघासाठी खेळणारा व्यक्ती आहे आणि तो लवकरच दमदार पुनरागमन करेल.

दरम्यान भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर संघर्ष करताना दिसतो आहे. २-१ ने कसोटी मालिका गमावल्यानंतर वनडे मालिकेतही त्यांच्यासाठी करा अथवा मरा अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण भारताने पर्लमधील बोलँड पार्क स्टेडियमवर झालेला पहिला वनडे सामना ३१ धावांनी गमावला आहे. प्रथम फलंदाजी करताना या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ४ बाद २९६ धावा केल्या होत्या. कर्णधार टेम्बा बावुमा आणि रासी वॅन डर डूसेनच्या शतकी खेळीच्या जोरावर त्यांनी इथपर्यंत मजल मारली होती.

हेही वाचा- धक्कादायक! बिहार पोलिसांनी सचिनचा चाहता ‘सुधीर कुमार’ला चोपलं, वाचा सविस्तर

प्रत्युत्तरात भारताकडून सलामीवीर शिखर धवन (७९ धावा), विराट कोहली (५१ धावा) आणि अष्टपैलू शार्दुल ठाकूर (५० धावा) यांनी अर्धशतके केली. परंतु इतर खेळाडूंना विशेष खेळी करता न आल्याने भारताचा संघ ५० षटकांमध्ये ८ बाद २६५ धावाच करू शकला. परिणामी त्यांना ३१ धावांनी सामन्यात पराभूत व्हावे लागले.

या पराभवासह भारतीय संघ वनडे मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. यानंतर पर्लच्या बोलँड पार्क मैदानावरच उभय संघ दुसरा वनडे सामना खेळत आहेत. जर भारताने हा सामनादेखील गमावला, तर त्यांच्या हातून वनडे मालिकाही जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! बिहार पोलिसांनी सचिनचा चाहता ‘सुधीर कुमार’ला चोपलं, वाचा सविस्तर

भारताच्या अंडर-१९ संघातील ५ खेळाडूंना कोरोना झाल्यामुळे ‘या’ पठ्ठ्यांची लॉटरी, जाणार वेस्ट इंडिजला

धोनीचा रोल मिळावा म्हणून सुशांत सिंग रजपूतने घेतली होती केवळ एवढी रक्कम

हेही पाहा-

अभ्यासू कीडा असलेला Axar Patel फक्त आज्जीमुळे बनला क्रिकेटर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---