पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया याने अयोध्येत बांधल्या गेलेल्या राम मंदिरासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. प्रभू रामांच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस जवळ येत असताना त्यानी लिहिले आहे की, “आमचे राजा श्री राम यांचे भव्य मंदिर तयार आहे आणि आता फक्त 8 दिवसांची प्रतीक्षा आहे.” यासोबतच त्यानी जय श्री रामचा नाराही दिला आहे.
दानिश कनेरिया (Danish Kaneria) याने या पोस्टसोबत स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोत तो भगवा झेंडा घेऊन उभा आहे. या झेंड्यात प्रभू रामांचा फोटो असून त्यांचे मंदिरही दिसते. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. (danish kaneria social media post on ram mandir ayodhya)
दानिश कनेरिया हा पाकिस्तानी हिंदू आहे. त्याचा जन्म कराची येथे झाला आहे. 2000 ते 2010 दरम्यान तो पाकिस्तान क्रिकेट संघाकडून खेळला आहे. तो या संघाचा मुख्य फिरकी गोलंदाजही होता. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 250 हून अधिक विकेट्स आहेत.
हमारे राजा श्रीराम का भव्य मंदिर है तैयार,
अब सिर्फ 8 दिन का है इंतजार!बोलो जय जय श्री राम। pic.twitter.com/poojMBb7U4
— Danish Kaneria (@DanishKaneria61) January 14, 2024
दानिश कनेरिया पाकिस्तान क्रिकेट संघात आपल्यासोबत होणाऱ्या भेदभावाबाबत अनेकवेळा सार्वजनिक मंचांवर वक्तव्य करत आहे. तो सातत्याने भारताच्या समर्थनार्थ बोलत असतो. अलीकडेच मालदीव आणि भारत यांच्यातील वादाच्या वेळी त्यानी एक पोस्टही टाकली होती. त्याने लक्षद्वीप लिहित एक इमोजी टाकला होता. लक्षद्वीप पाहिल्यानंतर मालदीव घाबरला आहे, त्यामुळेच त्यांचे मंत्री बेताल वक्तव्य करत आहेत, असेही तो यावेळी इथे म्हणाला होता. दानिश कनेरिया गेल्या काही काळापासून सातत्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची ( Narendra Modi) स्तुती करत असतो. (Now just waiting for 8 days Jai Shri Ram slogan from Pakistan before Prabhu Ram’s death)
हेही वाचा
IND vs AFG: इंदोरमध्ये कुलदीप ठरलाय खूपच घातक, अफगाणिस्तान संघाचं वाढू शकतं टेन्शन
Ranji Trophy: इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेअगोदर मयंकचा रणजीत धुमाकुळ, ठोठावलं भारतीय संघाचं दार