शारजाह येथे सुरू असलेल्या महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेत निवेदक डॅनी मॉरिसन यांची जीभ घसरली असल्याचे पाहायला मिळत आहे. सामन्या दरम्यान वेलोसिटी संघाची कर्णधार मिताली राज हिच्याशी मुलाखत करताना त्यांनी तिला ‘माय डियर’ (प्रिय) असे संबोधले आहे. मॉरिसन यांनी असे केल्याने त्याच्यावर अनेकांनी टीका केली आहे.
जॉनी मॉरिसन हे फार आधीपासूनच आयपीएल सारख्या स्पर्धेत निवेदक म्हणून आपल्याला दिसत आहेत. थोड्याशा विनोदी अंदाजात तो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतो. त्याने एखाद्या खेळाडूला विचारलेले बहुतांश प्रश्न हे मजेदार असतात. चेन्नईचा शेवटच्या सामन्यात धोनीला त्याच्या निवृत्तीबाबत केलेला प्रश्न हा अतिमहत्त्वाचा प्रश्न बनला आहे.
गुरुवारी वेलोसिटीची कर्णधार मिताली राज हिच्याशी मॉरिसन यांनी एक मुलाखत केली होती. या मुलाखतीची सुरुवात करताना मॉरिसन मिताली राजला ‘माय डियर’ असे म्हटला होता. त्यांनी असे म्हटल्याने त्याच्यावर अनेकांनी टीका देखील केली आहे.
‘माय डियर’ शब्द मॉरिसनला भोवले
“उद्या एका दिवसाची सुट्टी.. माझी प्रिय मिताली राज… तू उद्या काय करणार आहेस ? वेलोसिटी उद्या काय करणार आहे ?” असा प्रश्न मॉरिसन यांनी मितालीला केला होता. या प्रश्नावर विशेष लक्ष न देता मिताली राजने अतिशय साधारणपणे मॉरिसन यांच्या या प्रश्नाचे उत्तर दिले. उत्तरानंतरही गालातल्या गालातच मॉरिसनने तिला स्माईल दिली.
मॉरिसन यांनी वापरलेले हे शब्द अनेकांना पटले नसून त्यांनी मॉरिसन यांच्यावर टीका देखील केली आहे. ‘तुम्ही कित्येक वर्षे चेन्नईचा कर्णधार धोनीला माय डियर म्हणाला नसाल मग मितालीला कसे म्हणता ?’ असाही खोचक सवाल टीकाकार मॉरिसन यांनी विचारत आहेत.
https://twitter.com/Gagankv7/status/1324537016034361344
महिला क्रिकेटपटू सोबत अश्या पद्धतीचे शब्द वापरू नयेत. व निवेदकाने बोलताना आपण काय बोलतो याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे टीकाकार म्हणत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-ब्रेकिंग ! गौतम गंभीर सेल्फ आयसोलेट, स्वतः ट्विट करून दिली माहिती
-ऑस्ट्रेलियाला जाण्याआधी कोहलीचे मोठे भाष्य, ‘या’ कारणामुळे दौरे मोठे नसावेत
-“वैयक्तिक कीर्तिमान महत्वाचे परंतु…”, दिल्लीविरुद्धच्या विजयानंतर सूर्यकुमारची खास प्रतिक्रिया






