आयपीएलच्या धरतीवर बिहारमध्ये बीसीएल (बिहार क्रिकेट लीग) आयोजन केले गेले आहे. ज्यामध्ये पाच संघ हे सामने खेळत असून या स्पर्धेची चर्चा देशभर आहे. बिहारमधील ही स्पर्धा नवीन खेळाडूंसाठी एक मोठे व्यासपीठ मानली जात आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना या स्पर्धेत सहसल्लागार म्हणून जोडले गेले आहे. ज्याचा युवा खेळाडूंना फायदा होत आहे. यामध्ये न्यूझीलंड क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज डॅनी मॉरिसन यांनी देखील उपस्थिती दर्शवली.
या ठिकाणी आल्यानंतर ते खूप आनंदी दिसत होता. काही हिंदी शब्द बोलून ते त्याचा कसा वापर करतात हे देखील त्यांनी मीडियासमोर सांगितले.
माजी क्रिकेटपटू आणि समालोचक डॅनी मॉरिसन, हे पटना संघात एक सल्लागार म्हणून होते. जेव्हा ते बिहार क्रिकेट लीगमध्ये सहभागी होण्यासाठी पटना येथे पोहोचले तेव्हा ते या स्पर्धेबद्दल खूप उत्साही होते. उद्घाटन सामना संपल्यानंतर त्यांनी मीडियाला भेट दिली आणि या स्पर्धेविषयी आपले मत व्यक्त केले. हे लीग नवीन आणि उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी एक संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की, “भारतात असे बरेच क्रिकेटर्स आहेत, ज्यांनी अशा स्पर्धेत स्वत:ला सिद्ध केले आणि राष्ट्रीय संघात येऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली जागा निश्चित केली.” ते म्हणाले की “भारतीय संघ खूप मजबूत संघ आहे. युवा खेळाडूमुळे हा संघ नेहमीच एक नवीन पराक्रम करत असतो आणि सध्या भारतीय संघासाठी तरूणांची रांग लागली आहे.”
‘या स्पर्धेतून असे अनेक चेहरे सापडतील. जे भविष्यात भारतासाठी खूप प्रभावी ठरतील,’ असे देखील मॉरिसन म्हणाले.
या दरम्यान त्यांनी भारताशी असलेल्या संबंधाविषयीही सांगितले. त्यामध्ये ते बरेच हिंदी शिकले असून त्यातील काही शब्द माझ्या उपयोगाचे आहेत. येथे जेव्हा टॅक्सी चालक खूप वेगाने चालू लागतात, तेव्हा मी काही हिंदी शब्द बोलतो. जसे- जल्दी नहीं, आराम से, बहुत अच्छा…’
बिहार क्रिकेट लीग के लिए पटना पहुंचे @SteelyDan66 भी बोलते हैं हिंदी..आराम से..नहीं जल्दी.. pic.twitter.com/dkvmf8jUQs
— Thakur Shaktilochan shandilya (@Ershaktilochan) March 22, 2021
मॉरिसन हे प्रसिद्ध समालोचक असून त्यांनी न्यूझीलंडकडून १९८७-१९९७ दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. या दरम्यान त्यांनी ४८ कसोटी आणि ९६ वनडे सामने खेळले आहेत. त्यांनी कसोटीत १६० विकेट्स आणि वनडेत १२६ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
INDvENG: पहिल्या वनडेत खेळल्या २ सख्ख्या भावांच्या जोड्या; सात वर्षांनी घडला ‘हा’ योगायोग