गुरुवारी 16 आॅगस्टला कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये पार पडलेल्या सेंट ल्युसिया स्टार्स विरुद्ध ट्रिंबॅंगो नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात डॅरेन ब्रोवोने 36 चेंडुत नाबाद 94 धावांची तुफानी खेळी केली.
ट्रिंबॅंगो नाईट रायडर्सकडून खेळताना ब्रोवोने या सामन्यात सेंट ल्युसिया स्टार्सने दिलेल्या 213 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ही खेळी केली. या खेळीत त्याने तब्बल 10 षटकार आणि 6 चौकार मारले.
तो 10 व्या षटकात खेळायला आला होता. त्याने आणि ब्रेंडन मॅक्यूलमने चौथ्या विकेटसाठी 137 धावांची भागिदारी रचली. मॅक्यूलमनेही या सामन्यात 42 चेंडूत 6 षटकार आणि 3 चौकारांच्या सहाय्याने 68 धावा केल्या.
अखेरच्या 5 षटकात ट्रिंबॅंगो नाईट रायडर्सला विजयासाठी 85 धावांची गरज असताना ब्रावो आणि मॅक्यूलम या दोघांनी मिळून 3 षटकातच तब्बल 11 षटकार मारत 80 धावा केल्या. यात ब्रोवोने टाकलेल्या 16 व्या षटकात तर तब्बल 5 षटकार मारले.
मात्र 19 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मिशेल मॅक्लेघनने मॅक्यूलमला बाद करत ही जोडी फोडली.
WOW!! Check out todays #Playoftheday #Biggestpartysinsport pic.twitter.com/Drb9sOFIQS
— CPL T20 (@CPL) August 17, 2018
परंतू तोपर्यंत ट्रिंबॅंगो नाईट रायडर्स विजयाच्या समीप पोहचले होते. अखेर एक चेंडू बाकी ठेवत ट्रिंबॅंगोने 5 विकेट्सने विजय मिळवला.
तत्पूर्वी सेंट ल्युसिया स्टार्सकडून प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नर, रखीम काॅर्नवाॅल आणि किरॉन पोलार्डने अर्धशतके केली.
वॉर्नरने 55 चेंडूत नाबाद 72 धावा, काॅर्नवाॅलने 29 चेंडूत 53 धावा आणि पोलार्डने 23 चेंडूत नाबाद 65 धावा करत सेंट ल्युसियाला 4 बाद 212 धावांचा टप्पा गाठून दिला.
या संपूर्ण सामन्यात तब्बल 34 षटकारांची बरसात झाली. एका टी20 सामन्यात पहिल्यांदाच 34 षटकार मारण्याचा विक्रमही या सामन्यात झाला.
RECORD BREAKERS!!! 34 sixes in a T20 game, THE MOST EVER!!! #SLSvTKR #CricketPlayedLouder #CPL18 pic.twitter.com/huBFjpfjVu
— CPL T20 (@CPL) August 17, 2018
त्याचबरोबर 5 फलंदाजांनी एका टी20 सामन्यात अर्धशतके झळकवण्याची ही टी 20 इतिहासातील फक्त तिसरीच वेळ ठरली.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–अटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते
–तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ!
–खास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी