आज, 28 जूनपासून ग्लोबल टी20 कॅनडा लीगला सुरुवात होणार आहे. याआधी टोरंटो नॅशनल संघाचा कर्णधार डॅरेन सॅमीने मिडियाला चेंडू छेडछाड प्रकरणापासून पुढे जा असे खडसावत आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथला पाठिंबा दिला आहे.
मार्च महिन्यात झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळल्याने स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नरवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेटसाठी 1 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
या प्रकरणानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही खेळाडू क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहेत. या लीगमध्ये स्मिथ टोरंटो नॅशनल संघाकडून आणि डेविड वॉर्नर विनिपेग हॉक्स रोस्टर संघाकडून खेळणार आहे.
मंगळवारी अनेक वृत्तपत्रात स्मिथचा न्यूयॉर्क पबमध्ये बीयर पितानाचा फोटो छापण्यात आला होता. याबद्दलचे उदाहरण देत बुधवारी रात्री मिडियाशी संवाद साधताना सॅमी म्हणाला, ‘आधीच दुखावलेल्या व्यक्तीला सतत डिवचत राहणे योग्य नाही’
त्याचबरोबर तो पुढे असेही म्हणाला की तूम्ही चूका करता त्यासाठी शिक्षाही असते. याचा अर्थ असा नाही की सगळं ठीक आहे. पण जेव्हा तूम्ही चूक कबूल करता तेव्हा त्याबद्दल माफही करता यायला हवे. तूम्ही तूमच्या चूकीची किंमत मोजता पण यातून पुढेही गेले पाहिजे.’
त्याचप्रमाणे या खेळांडूनी चूक केली ज्याची किंमत त्यांनी मोजली आहे. पण आयुष्य पुढे जात असते.’
‘आता सर्व तुमच्यावर आहे. मी नुकतेच न्यूयॉर्क बाबतचे एक आर्टीकल बघितले. पण हे योग्य नाही. माझ्या मते एक खेळाडू म्हणून आम्हाला योग्य गोष्टी करायच्या असतात आणि पुढच्या पिढीसाठी चांगले उदाहरण समोर ठेवायचे असते. आम्ही चूका करतो, पण त्याचा अर्थ असा नाही की तूम्ही सतत त्या व्यक्तीला डिवचत रहाल.’
‘असे करण्यात कोणतीही माणूसकी नाही. मला वाटते की शिक्षा करणे बरोबर आहे. पण त्याचबरोबर माफ करुन पुढे जाणेही योग्य आहे.’
याआधीही अनेकदा सॅमीने स्मिथला पांठिबा दिला आहे. सॅमीचा टोरंटो नॅशनल संघ आज कॅनडाच्या लीगमध्ये वॅनकूवर नाईट्स विरुद्ध खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–केवळ १ धाव देत ७ फलंदाजांना दाखवला तंबूचा रस्ता, सामनाही जिंकला!
–टाॅप ५- या देशांच्या खेळाडूंनी केल्या आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा
–तुम्ही आॅस्ट्रेलियाला कमी समजू नका, सध्या आमचे दिग्गज खेळत नाहीत- कर्णधार टीम पेन