हैद्राबादमध्ये आजपासून सुरु होत असलेल्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपसाठी दिल्लीच्या संघाची घोषणा झाली. १२ खेळाडूंचा महिला आणि पुरुषांच्या दिल्ली संघाची घोषणा दिल्ली कबड्डी असोशिएशनचे निरंजन सिंह यांनी केली.
पुरुषांच्या संघाचे प्रशिक्षक रणबीर सिंग असतील तर जोगिंदर हे संघाचे व्यवस्थापक असतील. महिलांच्या संघाच्या प्रशिक्षका नीलम साहू असतील तर व्यवस्थापक जोगिंदर दलाल हे असतील.
पुरुषांचा संघ: दर्शन (कप्तान), श्रीराम निम्बोलकर, अश्वनी कुमार, अमित नागर, वचन सिंह, हरी भगवान, जनक सिंह गिल, अाशीष नागर, विजय दलाल, मोहित गौर, भानू प्रताप ताेमर, संजू
प्रशिक्षक- रणबीर सिंह, व्यवस्थापक- जोगिन्दर
महिलांचा संघ: भावना यादव (कप्तान), राखी अवस्थी, नीशा, मधु, सोनिया, शीतल, पुष्पा, मांशी शूर, मोनू, पिन्की, निधी, एकता पाठक
प्रशिक्षक- नीलम साहू
व्यवस्थापक- जोगिन्दर दलाल
या स्पर्धेत एकूण २९ राज्यांचे आणि सर्विसेस, रेल्वे आणि बीएसएनचे ३ असे ३१ संघ भाग घेणार आहे. यात भारतीय कबड्डी संघातील आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रो कबड्डीमधील स्टार कबड्डीपटू, जिल्हा आणि राज्य पातळीवर चमकदार कामगिरी केलेले आणि संघात निवड झालेले १५०० खेळाडू भाग घेणार आहेत.
ह्या स्पर्धेचा उदघाटन समारंभ ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. स्पर्धेत पुरुष आणि महिलांचे संघ असणार आहेत. नॉकआऊट अर्थात बाद फेरीचे सामने नवीन वर्षात अर्थात ३, ४ आणि ५ डिसेंबर रोजी होणार आहेत. हे सामने प्रकाशझोतात आणि मॅटवर खेळवले जाणार आहेत.
बाद फेरीचे सामने स्टार स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्सच्या अन्य चॅनेलवर चाहत्यांना पाहायला मिळू शकतात. विशेष म्हणजे ३ ते ५ डिसेंबर या काळातील पुरुष आणि महिलांचे सर्व सामने हे या चॅनेलवर दाखवले जाणार आहे.