पुणे, 2 फेब्रुवारी, 2024: अंकुर जोगळेकर मेमोरियल फाउंडेशन यांच्या वतीने व आयडीयाज-अ-सास कंपनी यांच्या सहकार्याने आयोजित 18व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेटअजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत दसॉल्ट सिस्टिम्स, ॲमडॉक्स या संघांनी दुसरा विजय मिळवला.
पीसीएमसी येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत गौरव सिंग 4-37) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दसॉल्ट सिस्टिम्स संघाने मर्क्स संघाचा 15 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना संग्राम पाटील 42(39,3×4), पियुष सावंत 28, अविरल 26, हृषीकेश निकम 16, विकास कुमार 19 यांनी केलेल्या धावांच्या जोरावर दसॉल्ट सिस्टिम्स संघाने 20 षटकात 9बाद 172धावा केल्या. याच्या उत्तरात मर्क्स संघाला निर्धारित षटकात 8 बाद 157धावाच करता आल्या. यात प्रतिक डी 40, रोहन शिंदे 38, अनिकेत कुलकर्णी 22 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. दसॉल्ट सिस्टिम्स संघाकडून गौरव सिंग(4-37), विकास कुमार(1-29) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
दुसऱ्या सामन्यात शुभम कुकडे(27 धावा व 1-7)याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर ॲमडॉक्स संघाने आयडीयाज अ सास कंपनी संघाचा 65 धावांनी पराभव करून दुसऱ्या विजयाची नोंद केली. मधू कामत(नाबाद 78)याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर डॉइश बँक संघाने टेक महिंद्रा संघाचा 21 धावांनी पराभव केला.
निकाल: साखळी फेरी:
डॉइश बँक: 20 षटकात 9बाद 169धावा(मधू कामत नाबाद 78 (58,10×4,2×6), पंकज लालगुडे 25, अनिल तेवानी 21, सचिन कुलकर्णी 2-13, स्वप्नील सावगावे 2-39)वि.वि.टेक महिंद्रा: 20 षटकात 8बाद 148धावा(शुभम दिघे 40(37,4×4), स्वप्नील सावगावे 27, सय्यद पटेल 16, अनिल तेवानी 2-17, तरण दीप सिंग 2-25, रोशन कामत 2-25); सामनावीर -मधू कामत;डॉइश बँक संघ 21 धावांनी विजयी ;
दसॉल्ट सिस्टिम्स: 20 षटकात 9बाद 172धावा(संग्राम पाटील 42(39,3×4), पियुष सावंत 28, अविरल 26, हृषीकेश निकम 16, विकास कुमार 19, प्रियांक चौहान 3-37, भैभब मिश्रा 2-39)वि.वि.मर्क्स: 20 षटकात 8 बाद 157धावा(प्रतिक डी 40(22,4×4), रोहन शिंदे 38(27,4×4,1×6), अनिकेत कुलकर्णी 22, गौरव सिंग 4-37, विकास कुमार 1-29; सामनावीर-गौरव सिंग; दसॉल्ट सिस्टिम्स संघ 15 धावांनी विजयी;
ॲमडॉक्स : 20 षटकात 9बाद 165धावा(निरंजन भागवत 38(28,6×4), विजयकुमार लोखंडे 37(28,4×4), शुभम कुकडे 27, अभिषेक पाटणकर 19, प्रवीण निंबोडिया 3-26, अरुण सिंग 2-32, रौनक टंक 2-16) वि.वि.आयडीयाज अ सास कंपनी: 20 षटकात 8बाद 100धावा(प्रवीण निंबोडिया 26, मयुरेश 17, आदित्य वर्मा 2-17, शुभम कुकडे 1-7, अभिषेक पाटणकर 1-10); सामनावीर-शुभम कुकडे;ॲमडॉक्स संघ 65 धावांनी विजयी
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG । जयस्वालच्या शतकानंतर राजस्थान रॉयल्सकडून रोहितला श्रेय! फ्रँचायझीची पोस्ट तुफान व्हायरल
IND vs ENG । द्विशतकाच्या जवळ पोहोचलाय जयस्वाल, पहिल्या दिवसाखेर भारताची 300+ धावांपर्यंत मजल