आयपीएल २०२२चा हंगाम संपायला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. २९ मे रोजी आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचा अंतिम सामना होणार आहे. अशात आयपीएलनंतर चेन्नई सुपर किंग्जचा हुकुमी एक्का दीपक चाहर लग्नबेडीत अडकणार आहे. चाहर त्याची प्रेयसी जया भारद्वाज हिच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्याच्या लग्नाची तारिख पुढे आली असून पत्रिकेचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
१ जून रोजी चाहर (Deepak Chahar) आणि जया (Jaya Bhardwaj) फतेहबाद रोडवरील पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न करणार असल्याची माहिती पुढे(Deepak Chahar Marriage Date) येत आहे. ३१ मे रोजी त्यांच्या लग्नाच्या विधी सुरू होतील. त्याचे कुटुंबीय लग्नाच्या तयारीलाही लागले आहेत. त्याच्या लग्नात बऱ्याच भारतीय क्रिकेटपटूंसोबत काही मोठ्या व्यक्तीही सहभागी होणार असल्याचे समजत आहे.

चाहरने गतवर्षी ऑक्टोबरमध्ये दुबईतील आयपीएल सामन्यादरम्यान त्याची प्रेयसी जयाला लग्नासाठी प्रपोज केले होते. यावर जयाने चाहरला लग्नासाठी होकारही दिला होता. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी व इतर खेळाडू आणि सर्व प्रेक्षकांसमक्ष त्याने जयाला प्रपोजल दिले होते. यानंतर आता त्यांच्या लग्नाची तारिख निश्चित झाली आहे. ३१ मे रोजी फतेहबादमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये संध्याकाळी ६.३० वाजता मेहंदी आणि रात्री ९ वाजता संगीताचा कार्यक्रम सुरू होईल. त्यानंतर १ जून रोजी रात्री ९ वाजता लग्नसोहळ्याला सुरुवात होईल. चाहर आणि जयाच्या लग्नपत्रिकेचा (Deepak Chahar Wedding Card) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
She said yesssss.! ????
Congratulations Cherry.! Stay Merry.! ????????#WhistlePodu #Yellove ???????? pic.twitter.com/qVmvVSuI7A
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 7, 2021
कोण आहे जया भारद्वाज?
जया भारद्वाज ही अभिनेता सिद्धार्थ भारद्वाजची बहिण आहे. सिद्धार्थ बिग बॉस-५ आणि प्रसिद्ध कार्यक्रम स्प्लिट्सव्हिलाचा सदस्य राहिला आहे. तर जया एमबीए केल्यानंतर दिल्लीमध्ये एका टेलिकॉम कंपनीत डिजीटल प्लॅटफॉर्मची हेड आहे. जया लहान असतानाच तिच्या वडिलांचे निधन झाले होते. तिच्या आईने होर्डिंग डिझाइनचा व्यवसाय सांभाळत त्यांच्या दोन्ही मुलांना लहानाचे मोठे केले आहे.
राहुल चाहरनेही केलंय लग्न
दीपक चाहरपूर्वी ९ मार्च रोजी त्याचा भाऊ राहुल चाहर लग्नात अडकला आहे. त्याने गोव्यात त्याची प्रेयसी ईशानी जोहर हिच्यासंगे विवाह केला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नईच्या गोलंदाजांना घाम फोडल्यानंतर अश्विनचा मोठा खुलासा, म्हणाला, ‘माझ्यात डेविड वॉर्नर घुसलेला’
‘रॉयल’ विजयानंतर अश्विनच्या आनंदाला उधाण! पत्नी आणि लेकीलाही आभाळ झाले ठेंगणे, पाहा व्हिडिओ
मुंबईने शेअर केला अर्जुन तेंडुलकरचा व्हिडिओ, भेदक यॉर्कर वाढवेल दिल्लीच्या फलंदाजांची डोकेदुखी?






