---Advertisement---

स्वीडनच्या या फुटबॉलपटूला बेकहॅमच्या म्हणण्यानुसार घालावी लागेल इंग्लंडची जर्सी

---Advertisement---

स्वीडनचा फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविच इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम बरोबर लावलेली पैज हरला आहे.

इब्राहिमोविच ही पैज हरल्याने त्याला बेकहॅमची अट मानावी लागणार आहे. यामध्ये सांगितलेल्या अटीनुसार इब्राहिमोविचला इंग्लंडमधील विम्बली स्टेडियमवर येऊन इंग्लंडची जर्सी घालून सामना बघायचा आहे. तसेच त्याला यावेळी मासे आणि चिप्सही खावे लागणार आहे.

रशियात नुकत्याच झालेल्या फिफा स्पर्धेत इंग्लंड विरुद्ध स्वीडन असा उपांत्यपूर्व फेरीचा सामना झाला.  या सामन्यावरूनच इब्राहिमोविचने बेकहॅमला आव्हान दिले होते.

‘जर इंग्लड जिंकला तर मी तुला जेथे आणि जसे जेवण लागेल ते आणून देईल. पण जर का स्वीडन जिंकला तर तू मला आईका शॉपमधून जे पाहिजे ते खरेदी करून देशील’,अशी पैज त्याने बेकहॅमसमोर ठेवली होती.

https://twitter.com/utdxtra/status/1019961754355421184

या सामन्यात इंग्लंडने स्वीडनला 2-0ने पराभूत केले होते. म्हणूनच आता इब्राहिमोविचला  बेकहॅमचे म्हणणे मानावे लागणार आहे.

तसेच अमेरिकेत सुरू असलेल्या मेजर सॉकर लीगमध्ये एल ए गॅलक्सीकडून खेळताना इब्राहिमोविचने 15 सामन्यात 12 गोल केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

रोनाल्डोमुळे इटालियन फुटबॉलमध्ये बदल घडतील- नेमार

बार्सिलोनाची ट्रेनिंग जर्सी आणि तोटेनहॅमची मुख्य जर्सी सारखीच!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment