ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघातील फलंदाज आणि गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. परंतु, सामन्याच्या शेवटच्या दिवशी (८ ऑगस्ट) भारतीय संघ विजयाच्या जवळ असताना पावसाने अडथळा निर्माण केला होता, ज्यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला होता.या सामन्यात जेम्स अँडरसनने कर्णधार कोहलीला पहिल्याच चेंडूवर बाद केले होते. हे पाहून माजी इंग्लिश क्रिकेटपटूला भलताच आनंद झाला आहे.
पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजी करण्यासाठी आला होता. परंतु, जेम्स अँडरसनने अप्रतिम आऊट स्विंग होणारा चेंडू टाकला होता. तो चेंडू विराटच्या बॅटचा कडा घेत यष्टिरक्षक जोस बटलरच्या हातात गेला होता. हे पाहून डेविड लॉयड भलतेच खुश झाले.
त्यांनी डेली मेलच्या एका स्तंभात लिहिले की, “काय नाट्यपूर्ण क्षण होता, जेव्हा जेम्स अँडरसनने आपल्या पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीला बाद करत माघारी धाडले. भारतीय कर्णधाराने एका ग्लॅडीएटर सारखी एन्ट्री केली होती. परंतु, जुन्या योद्ध्याने अप्रतिम गोलंदाजी केली. जेम्स अँडरसनचा उत्साह हा कोहलीच्या निराशेच्या अगदी उलट होता. तो तिथे चुपचाप उभा होता. परंतु, त्याला मैदानाबाहेर जावे लागले होते. हा कसोटी क्रिकेटमधील एक अविस्मरणीय क्षण होता. हा क्षण विसरण्यासारखा नाही.”(David lloyod hail James Anderson for discussing Virat Kohli on zero)
जेम्स अँडरसन आणि विराट कोहली या दोन्ही दिग्गज खेळाडूंमध्ये ही चुरशीची लढत २०१४ पासून सुरू आहे. २०१४ मध्ये झालेल्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यात अँडरसनने विराटला ४ वेळेस माघारी धाडले होते. त्यानंतर २०१६ मध्ये देखील या दोघांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली होती. परंतु, २०१८ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत विराट कोहलीने जोरदार पुनरागमन केले होते. कोहलीने या मालिकेत ५९३ धावा केल्या होत्या. यावेळी कोहली जेम्स अँडरसनवर भारी पडला होता. अँडरसनने या मालिकेत कोहलीला एकही वेळेस बाद केले नव्हते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘शार्दुल ठाकूरच गोलंदाजी प्रशिक्षकांना अधिक शिकवत असेल’, दिनेश कार्तिकचे खळबळजनक विधान