भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेची सुरुवात गुरुवारी (९ जून) झाली. मालिकेचा पहिला सामना दक्षिण आफ्रिका संघाने ७ विकेट्स राखून जिंकला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभी केली होती, पण प्रत्युत्तरात आफ्रिकी संघाने त्याहीपेक्षा चांगले प्रदर्शन करून दाखवले. मध्यक्रमातील डेविड मिलर आणि रस्सी व्हॅन डर दुसेन यांनी आफ्रिकी संघाला विजय मिळवून दिला. या दोघांनी भारताविरुद्ध त्यांच्याच मायदेशात सर्वात मोठी भागीदारी केली.
टी-२० क्रिकेटमध्ये भारतात खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताविरुद्ध सर्वात मोठी भागादारी डेविड मिलर (David Miller) आणि रस्सी व्हॅन डर दुसेन (Rassie van der Dussen) यांनी केली. उभय संघातील टी-२० मालिकेच्या पहिल्या सामन्यात या दोघांनी १३१ धावांची भागीदारी केली. यामध्ये मिलरने ३१ चेंडू ६४ धावा केल्या, ज्यामध्ये ४ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. तर दुसेनने ४६ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७५ धावा केल्या.
भारताविरुद्ध त्यांच्या मायदेशात टी-२० सामना खेळताना जोस बटलर (Jos Buttler ) आणि डेविड मलान (Dawid Malan) यांनी दुसरी सर्वात मोठी भागीदारी केली होती. २०२१ मध्ये इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर असताना खेळलेल्या एका टी-२० सामन्यात बटलर आणि मलान यांनी १३० धावांची भागीदारी केली होती. ही भागीदारी या महत्वाच्या यादीत अगोदर पहिल्या क्रमांकावर होती, पण दुसेन आणि मिलर जोडीमुळे आता ही जोडी दुसऱ्या क्रमांकावर घसरली आहे.
दरम्यान, उभय संघातील या पहिल्या टी-२० सामन्याचा विचार केला, तर भारताने नाणेफेक गमावल्यानंतर त्यांना प्रथम फलंदाजी करावी लागली. मर्यादित २० षटकांमध्ये भारताच्या ४ खेळाडूंनी विकेट्स गमावल्या आणि यामध्ये २११ धावा केल्या. या धावा करण्यासाठी सलामीवीर इशान किशनने सर्वाधिक ७६ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाने ३ विकेट्स गमावल्या आणि १९.१ षटकात लक्ष्य गाठले. डेविड मिलर आणि दुसेनने संघासाठी सर्वाधिक धावांचे योगदान दिले आणि सामना जिंकवला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
दिल्लीत तळपली इशान किशनची बॅट, तडाखेबंद फलंदाजीने केली रोहित अन् रैनाच्या विक्रमाची बरोबरी