Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हार्दिकच्या नेतृत्वाबाबत गुजरात टायटन्सच्या फिनिशरचे मोठे विधान; म्हणाला, “त्याच्यात ते गुण…”

January 7, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
miller-pandya

Photo Courtesy : Iplt20.com


सध्या भारतीय टी20 क्रिकेट संघाची धुरा अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्या हाती आहे. श्रीलंकेविरुद्धच्या‌ टी20 मालिकेत तो भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसतोय. मागील आठ महिन्यांच्या कालावधीत त्याने वैयक्तिक कामगिरीसह आपल्यातील नेतृत्व गुण देखील दाखवले आहेत. त्याच्या याच नेतृत्व गुणांचे दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज डेव्हिड मिलर याने कौतुक केले आहे.

डेव्हिड मिलर याने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये त्याने हार्दिक पंड्याचे कौतुक केले. कर्णधार म्हणून हार्दिकची कारकीर्द उज्वल असल्याचे त्याने म्हटले. मिलर म्हणाला,

“हार्दिकला मी अत्यंत जवळून नेतृत्व करताना पाहिले आहे. त्याच्याकडे एका चांगल्या कर्णधाराचे सर्व गुण मला दिसले. तो इतरांपेक्षा काहीसा वेगळाच वाटतो. हार्दिक नक्कीच भारताचा एक यशस्वी कर्णधार म्हणून इतिहासात आपले नाव नोंद करेल.”

हार्दिकने 2022 मध्ये प्रथमच आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले होते. मिलर या संघाचा भाग होता. मिलरने फिनिशर म्हणून गुजरातच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावलेली. हार्दिकने आपल्या नेतृत्वात पहिल्यांदाच आयपीएल मध्ये सहभागी झालेल्या गुजरातला विजेतेपद पटकावून दिलेले. त्यानंतर त्याला आयर्लंड व न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. या मालिकांमध्ये ही भारतीय संघाने विजय मिळवला होता. सध्या त्याला भारतीय टी20 संघाचा नियमित कर्णधार करण्याचा विचार सुरू आहे. 2022 टी20 विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागल्यानंतर टी20 संघाचे नेतृत्व त्याच्याकडे द्यावी अशी अनेक माजी क्रिकेटपटूंनी मागणी केलेली. त्यामुळे बीसीसीआय सातत्याने त्याला काही कमी महत्त्वाच्या मालिकांमध्ये नेतृत्व देत पारखण्याचा प्रयत्न करत आहे.

(David Miller Said Hardik Pandya Will Become Successful Captain)

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हा तर गोलंदाजांचा अपमान’, रन-आऊट प्रकरणात अश्विनने घेतली ऍडम झम्पाची बाजू, डेविस हसीला सुनावले
श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकारा फिट, पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये केले गेले यशस्वी उपचार


Next Post
Photo Courtesy: Twitter

तिसऱ्या टी20 मध्ये नाणेफेकीचा कौल हार्दिकच्या बाजूने! घेतला प्रथम फलंदाजीचा निर्णय

File Photo

प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सव | महात्मा गांधी विद्यामंदिर उपविजेता, नंदादीपला खोखोतही यश

Photo Courtesy: Twitter

अशी राहिलीये टीम इंडियाच्या नव्या निवडसमिती सदस्यांची खेळाडू म्हणून कारकीर्द; अनुभवाच्या बाबतीत...

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143