आयपीएल (IPL) 2026 च्या 26 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) 6 विकेट्सने पराभूत केले. बेंगळुरूने विजयासाठी दिलेल्या 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली होती, पण डेव्हिड मिलरने (David Miller) शेवटच्या षटकात सलग 2 षटकार मारून दिल्लीला विजय मिळवून दिला.
आयपीएलमध्ये लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना (Run Chase) 20 व्या षटकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मिलरने आता कायरन पोलार्डला मागे टाकले आहे. मिलर आता या यादीत महेंद्रसिंग धोनीनंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
20 व्या षटकात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज (यशस्वी पाठलाग करताना):
एमएस धोनी: 14 षटकार (57 चेंडू)
डेव्हिड मिलर: 9 षटकार (26 चेंडू)
कायरन पोलार्ड: 7 षटकार (22 चेंडू)
डेव्हिड मिलरने आतापर्यंत आयपीएलमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना 36 डावांमध्ये 98.81 च्या सरासरीने 1087 धावा केल्या आहेत. यात त्याने 6 अर्धशतके आणि 1 शतक झळकावले आहे.
डिफेंडिंग चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा या सीझनमधील 6 सामन्यांमधला हा दुसरा पराभव आहे. विशेष म्हणजे, आरसीबीने आपल्या घरच्या मैदानावर (चिन्नास्वामी स्टेडियम) सलग 5 सामने जिंकले होते, पण दिल्ली कॅपिटल्सने हा सामना जिंकून त्यांची ही विजयी मालिका खंडित केली आहे.






