स्टीव स्मिथ आणि डेविड वॉर्नर हे दोन्ही फलंदाज ऑस्ट्रेलियन संघासाठी महत्वाचे आहेत. सध्या सुरू असलेल्या ऍशेस मालिकेतही या दोघांची भूमिका महत्वाची आहे. पण अशातच स्मिथ आणि वॉर्नरच्या कसोटी निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने या चर्चांना अधिकच हवा दिली.
यावर्षी ऍशेस मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. मालिकेतील चार कसोटी सामन्यांनंतर ऑस्ट्रेलिया आघाडीवर आहे. मालिकेतील चौथा सामना गुरुवारी (27 जुलै) सुरू होत आहे. हा सामना लंडनच्या केविंग्टन ओव्हल स्टेडियमवर होणार आहे. पण मायकल वॉन (Michael Vaughan) याच्या मते स्टीव स्मिथ (Steve Smith) आणि डेविड वॉर्नर (David Warner) या सामन्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतात. तिसरी ऍशेस कसोटी मॅनचेस्टरमध्ये खेळली गोली. शेवटच्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने सामना अनिर्णित राहिला. मायकल वॉनच्या मते पाऊस सुरू असताना पत्रकारांमध्ये वॉर्नर आणि स्मिथच्या निवृत्तीबाबत चर्चा सुरू होती.
मायकल वॉन माध्यमांपुठे म्हणाला की, “पाऊस पडत असल्यामुळे पत्रकारांना थोडे कंटाळवाणे वाटत होते. अशा वेळी तुम्ही काही लोकांशी चर्चा करता, जे स्वाभाविक आहे. त्यावेळी असे अंदाज बांधले जात होते आणि त्यांना ही माहिती कढून मिळाली हे मलाही सांगता येणार नाही. जर वॉर्नर ओव्हल स्टेडियमवर केळला, तर हा त्याचा शेवटचा कसोटी सामना असू शकतो. स्टीव स्मिथच्याही चांगल्याच चर्चा आहेत. स्मिथ ओव्हलवर ऑस्ट्रेलियासाठी शेवटचा सामना खेळू शकतो. पण मी हे वैयक्तिक याविषयी माहिती नाहीये, पण असा अंदाज बांधला जात आहे.”
“अशीही शक्यता आहे की, मॅनचेस्टरमध्ये पाऊस पडत असल्यामुळे अशा चर्चा सुरू झाल्या असतील. पण प्रेस बॉक्समध्येही अशा चर्चा होत्या की, काही ऑस्ट्रेलियन दिग्गज ओव्हलमध्ये शेवटचा सामना खेळू शकतात,” असे वॉन पुढे म्हणाला.
दरम्यान, स्मिथने चालू ऍशेस मालिकेत लॉर्ड्सवर एख शानदार शतक केले आहे. त्याने या सामन्यात 110 धावांची महत्वपूर्ण खेळी केली आणि सामनावीर ठरला. त्याव्यतिरिक्त 34, 22 आणि 41 धावांचे योगदान दिले आहे. राहिलेल्या चार डावांमध्ये स्मिथ एकदारी 20 धावांचा टप्पा पार करू शकला नाहीये. दुसरीकडे वॉर्नरने यावर्षी ऍशेसमध्ये फक्त एक अर्धशतक केले आहे. तो तीन वेळा एक आखडी धावसंख्येवर बाद झाला आहे. वॉर्नरने मालिकेतील पहिल्याच कसोटीत निवृत्तीबाबत आपेल नियोजन सांगितले होते. त्याने सांगितल्यानंतर ऑस्ट्रेलियन सलामीवीर 2024 च्या सुरुवातील कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. पण वॉनच्या वक्तव्यानंतर ओव्हल कसोटीनंतर या दोगंच्या वक्तव्यांकडे सर्वांचे लक्ष असेल. (David Warner and Steve Smith will retire after the fifth Ashes Test, Michael Vaughan has heard)
महत्वाच्या बातम्या –
‘तो काहीकाळ गोलंदाजी आक्रमणात कायम असेल’, मुकेश कुमारवर झहीर प्रभावित
लवकरच जन्माला येणार बेबी मॅक्सवेल! भारतीय संस्कृतीनुसार पार पडले विनी रमनचे डोहाळे जेवण