दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान पाच सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसऱ्या सामना सध्या ब्लोएमफातेन येथे खेळला जातोय. या सामन्यात प्रथम फलंदाजी संधी मिळालेल्या ऑस्ट्रेलिया संघाने शानदार सुरुवात करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर व ट्रेविस हेड यांनी अवघ्या 10 षटकातच शतकी भागीदारी करत विश्वविक्रम बनवला.
पहिल्या सामन्यात निसटता विजय मिळवल्यानंतर या सामन्यात ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. मागील सामन्यात अपयशी ठरलेल्या वॉर्नर याने या सामन्यात शानदार सुरुवात केली. अप्रतिम फॉर्ममध्ये असलेल्या हेडने त्याला साथ देत आक्रमण केले. दोघांनी विरोधी गोलंदाजांना संधी न देता 10 षटकांच्या पावर प्लेमध्ये बिनबाद 102 धावा केल्या. हेडने अवघ्या 26 आपले अर्धशतक पूर्ण केले.
वनडे क्रिकेट इतिहासातील पावर प्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील या जोडीने आपल्या नावे केला. यापूर्वी श्रीलंकेसाठी निरोशन डिकवेला व उपुल तरंगा या जोडीने 2017 मध्ये केपटाउन येथे पहिला दहा षटकात शंभर धावा केलेल्या. त्यांचा हा विक्रम आता वॉर्नर-हेड जोडीने आपल्या नावे केला आहे.
दुसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका-
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडेन मार्कराम, हेन्रिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, अँडिले फेहलुक्वायो, कागिसो रबाडा, एन्रिक नॉर्किए, तबरेझ शम्सी
ऑस्ट्रेलिया-
डेव्हिड वॉर्नर, ट्रेविस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), मार्नस लॅब्युशेन, जोश इंग्लिस, ऍलेक्स केरी (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, ऍरॉन हार्डी, शॉन ऍबॉट, नॅथन एलिस, ऍडम झम्पा.
(David Warner And Travis Head Hits 102 In Powerplay Creat ODI Record Against South Africa)
महत्वाच्या बातम्या –
श्वानप्रेमी विराट! प्रॅक्टिस सेशनमध्ये दाखल झालेल्या पपीचा केला लाड, खेळला फुटबॉल
“धोनी साक्षात देवासारखा!”, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूने सांगितला आयपीएलचा ‘तो’ अनुभव