---Advertisement---

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत डेव्हिड वॉर्नर दिसणार नव्या भूमिकेत, करणार ‘हे’ काम

On: गुरूवार, जानेवारी 4, 2024 3:00 PM
David-Warner-Retirement
---Advertisement---

David Warner After Retirement: सिडनी येथे खेळला जात असलेला ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान कसोटी सामना डेव्हिड वॉर्नर याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना आहे. यानंतर तो ऑस्ट्रेलियाच्या कसोटी जर्सीमध्ये कधीही मैदानात परतणार नाही. मात्र, दरम्यान, त्याच्या कसोटी क्रिकेटमधील नव्या अवताराची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. वॉर्नर आता कसोटी मालिकेदरम्यान समालोचकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे. 

समालोचक म्हणून डेव्हिड वॉर्नर (David Warner) याची पहिली मालिका भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असू शकते. खरंतर भारतीय संघाला या वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे. येथे भारतीय संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या या कसोटी मालिकेत डेव्हिड वॉर्नर समालोचकाची भूमिका बजावू शकतो.

डेव्हिड वॉर्नरच्या या नव्या भूमिकेबद्दल क्रिकेट चाहते आधीच उत्सुक आहेत. खरं तर, वॉर्नर क्रिकेटच्या मैदानावर आपल्या कृत्यांसह चाहत्यांचे खूप मनोरंजन करतो. मैदानाबाहेरही तो सोशल मीडियावर आपल्या मजेशीर व्हिडिओंनी चाहत्यांना आनंद देत असतो. अशा परिस्थितीत वॉर्नर क्रिकेटपटूपेक्षा समालोचक म्हणून अधिक यशस्वी ठरेल, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.

पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची लाल चेंडूची मालिका असेल, असे डेव्हिड वॉर्नरने पूर्वीच जाहीर केले होते. यासह 2024 च्या सुरुवातीला त्यानी आणखी एक मोठी घोषणा केली. त्याने एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. अशाप्रकारे 2023 च्या विश्वचषकातील अंतिम सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा वनडे सामना ठरला. मात्र, वॉर्नरने 2025 मध्ये एकदिवसीय फॉर्मेटमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. यासोबतच तो जगभरातील फ्रँचायझी टूर्नामेंटमध्ये टी20 क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. (IND vs AUS David Warner will be seen in a new role in the India-Australia Test series)

हेही वाचा

मोठी घोषणा: रणजी ट्रॉफी स्पर्धेला उद्यापासून सुरुवात, अशी आहे 16 सदस्यीय टीम महाराष्ट्र
IND vs SA: केपटाऊन कसोटीबाबत दक्षिण आफ्रिका कर्णधाराचे लक्षवेधी विधान, म्हणाला, ‘आम्ही या विकेटवर 100 धावाही…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---