---Advertisement---

मुलींच्या हट्टासाठी गाण्यावर थिरकला डेविड वॉर्नर, पाहा व्हिडिओ

On: शनिवार, जून 4, 2022 4:19 PM
David-Warner-Dancing
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर अनेकदा आपल्या सोशल मिडीया पोस्ट आणि इंस्टाग्राम रिल्स वरून चर्चेत असतो. अशीच एक पोस्ट त्याने सध्या त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये वॉर्नर त्याच्या मुलांसोबत जान्स करताना दिसत आहे. शिवाय व्हिडिओच्या शेवटी त्याने चाहत्यांची माफी देखील मागितली आहे.

वॉर्नरने हा व्हिडेओ पोस्ट करत असताना त्याला एक विशेष कॅपशन दिले आहे. ज्यात वॉर्नेरने लिहिले आहे की, “माझ्या मुलींनी पुन्हा एकदा त्यांच्या नाचात मला सामावून घेतले,” याशिवाय आपल्या खराब डान्ससाठी वॉर्नरने त्याच्या चाहत्यांची माफी देखील मागितली आहे.

या व्हिडिओमध्ये, सर्वांच्या नजरा वॉर्नरची धाकटी मुलगी इस्लावर टिकून राहत आहेत, कारण ती दोन्ही मोठ्या बहिणींप्रमाणे नृत्य करण्यात पारंगत नाही. व्हिडिओ सुरू होताच, लहान इस्ला तिच्या बहिणींना पाहून नाचण्याचा प्रयत्न करते. शेवटी, जेव्हा तिला कॉपी करता येत नाही, तेव्हा ती फक्त टाळ्या वाजवून आपला आनंद व्यक्त करते. इस्लाची ही शैली पाहण्यासारखी आहे. वॉर्नरचा हा कौटुंबिक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. डेव्हिड वॉर्नरची पत्नी कँडी वॉर्नरनेही व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, “खूप छान इस्ला, फक्त बहिणींना स्टेप बाय स्टेप फॉलो करत रहा.”

https://www.instagram.com/reel/CeVRNStFY6w/?utm_source=ig_web_copy_link

डेव्हिड वॉर्नरचे त्याच्या मुलींवर खूप प्रेम आहे. याचे एक उदाहरण आयपीएलच्या वेळी पाहायला मिळाले, जेव्हा वडिलांच्या लवकर बाद झाल्यानंतर मुली उदास दिसत होत्या. त्याचवेळी, मुलींनी वडिलांकडे तक्रार केली होती की, जोस बटलर आयपीएलमध्ये सतत शतके झळकावत आहे, तुम्हाला हे जमत नाही. त्यावेळी या बाप-लेकीं मधील प्रेम जगासमोर आले होते.

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल मध्ये  वॉर्नरने १२ सामन्यांत ४३२ धावा बनवल्या आहेत. यामध्ये नाबाद ९२ ही त्याची सर्वाधिक खेळी आहे. मुंबई विरुद्ध झालेल्या शेवटच्या लीग सामन्यात वॉर्नर विशेष प्रदर्शन करण्यास अयशस्वी ठरल्याने दिल्लीला पराभव पत्कारावा लागला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---