---Advertisement---

David Warner Farewell: सिडनीत वॉर्नरच्या निरोप समारंभासाठी प्रेक्षकांना थेट मैदानात एंट्री, पाहा व्हायरल फोटो

On: रविवार, जानेवारी 7, 2024 2:53 PM
David-Warner-Farewell
---Advertisement---

David Warner Retirement: सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने पाकिस्तानचा 8 विकेट्स राखून पराभव करत मालिका 3-0 अशी जिंकली. या विजयासह डेव्हिड वॉर्नर याच्या कसोटी कारकिर्दीचाही संस्मरणीय शेवट झाला. आपल्या शेवटच्या कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना वॉर्नरने 68 चेंडूत 34 धावा केल्या होत्या पण पहिल्या डावातील उणीव त्याने दुसऱ्या डावात 56 चेंडूत अर्धशतक पूर्ण करून भरून काढली. ऑस्ट्रेलियाने एससीजीमध्ये 130 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत मालिका 3-0 ने जिंकली.

साजिद खान कडून बाद होण्यापूर्वी डेव्हिड वॉर्नर याने 75 चेंडूत सात चौकारांच्या मदतीने 57 धावा केल्या. वॉर्नर बाद होताच एससीजीमध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांनी त्याला स्टँडिंग ओव्हेशन दिले. एवढेच नाही तर वॉर्नरची ही शेवटची कसोटी संस्मरणीय करण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने चाहत्यांना मैदानात येण्याची परवानगीही दिली.

सामना संपल्यानंतर चाहते मैदानात आले आणि वॉर्नरला शेवटच्या वेळी जवळून पाहिले. चाहत्यांना मैदानात येताना पाहून तुम्हालाही ८० च्या दशकाची आठवण होईल कारण त्यावेळी असे व्हायचे की, जेव्हा संघ सामना जिंकायचा तेव्हा चाहते मैदानात उतरून जल्लोष करायचे आणि वॉर्नरच्या फेअरवेल टेस्टमध्येही काही असेच दृश्य पाहायला मिळाले.

Image

सामन्यानंतर वॉर्नर म्हणाला, “हे जवळजवळ स्वप्नपूर्तीसारखे आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासाठी 3-0 असा विजय मिळवला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकली, एशेस मालिका ड्रॉ केली आणि त्यानंतर विश्वचषक 2023 जिंकला.”

112 कसोटी सामन्यांमध्ये 44.59 च्या सरासरीने आणि 70.19 च्या स्ट्राइक रेटने 8786 धावा करून 37 वर्षीय वॉर्नरने आपली कसोटी कारकीर्द संपवली. ज्यामध्ये 26 शतके आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. यापूर्वी वॉर्नर स्टीव्ह वॉ याला मागे टाकून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनला होता. (David Warner Farewell Spectators enter stadium live for Warner’s farewell ceremony in Sydney, see viral photo)

हेही वाचा

रिषभ पंतची बहीण साक्षीची नव्या इनिंगला सुरूवात; बाॅयफ्रेंड अंकित चौधरीसोबत केली एंगेजमेंट, पाहा फोटो
T20 World Cup: उफाळला नवा वाद; IND vs PAK सामन्याच्या पोस्टरमधून रोहित गायब, टी20 विश्वचषकात हार्दिक होणार कर्णधार?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---