David Warner Farewell: 6 जानेवारी रोजी ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर पाकिस्तानविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळला. यानेळी त्याला त्याचे सहकारी, प्रेक्षक आणि पाकिस्तान क्रिकेट संघाकडून निरोप मिळाला. वॉर्नरची निवृत्ती हे त्या दिवसाचे मोठे आकर्षण असले तरीही, पण आणखी एका गोष्टीने लोकांचे लक्ष वेधून घेतले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वॉर्नरची मोठी मुलगी तिच्या वडिलांच्या निरोपाच्या समारंभादरम्यान बहिणीकडून स्ट्रीमर हीसकावून घेण्याचा प्रयत्न करत होती. कॅमेरामनने तो क्षण टिपताच ती क्लिप मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आली.
या व्हिडीओमध्ये डेव्हिड वाॅर्नर (David Wraner) याच्या मुली एकमेकींकडून स्ट्रीमर हिसकावून घेताना दिसत आहेत. वाॅर्नरच्या निरोप समारंभ कार्यक्रमापेक्षा सध्या या व्हिडीओची जास्त चर्चा होत आहे. (David Warner Farewell Warner’s daughters fight after farewell match watch viral video)
My favourite bit about yesterday was Warner’s eldest on the ground trying to take the streamers from her sister. Real big sister areas. 😂 pic.twitter.com/6LuU8I4kjn
— Georgie Parker (@georgieparker) January 6, 2024
वाॅर्नरबद्दल बोलायचं झालं तर निरोप समारंभात बोलताना खूप भावूक झालेला पाहायला मिळाला. सामन्यानंतर सामन्यानंतर वॉर्नर म्हणाला, “हे जवळजवळ स्वप्नपूर्तीसारखे आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासाठी 3-0 असा विजय मिळवला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकली, एशेस मालिका ड्रॉ केली आणि त्यानंतर विश्वचषक 2023 जिंकला.”
112 कसोटी सामन्यांमध्ये 44.59 च्या सरासरीने आणि 70.19 च्या स्ट्राइक रेटने 8786 धावा करून 37 वर्षीय वॉर्नरने आपली कसोटी कारकीर्द संपवली. ज्यामध्ये 26 शतके आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. यापूर्वी वॉर्नर स्टीव्ह वॉ याला मागे टाकून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनला होता.
हेही वाचा
खासदार साब! टीम इंडियाला रडवणारा क्रिकेटर बनला खासदार, दणदणीत विजयासह पोहचला लोकसभेत
अंबाती रायुडू पुन्हा मुंबई इंडियन्स संघात, खेळणार ‘हे’ महत्त्वाचे सामने