ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर सध्या अत्यंत वाईट काळातून जात आहे. त्याची कामगिरी त्याच्या खेळाला साजेशी अशी होत नाही. तसेच क्रिकेटच्या बाहेर देखील तो सातत्याने वादात अडकलेला दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर तो सोमवारपासून (26 डिसेंबर) सुरू होत असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत उतरेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळली जाणारी ही कसोटी त्याच्या कारकिर्दीतील 100 वी कसोटी असेल. विशेष म्हणजे याच कसोटीवर त्याची पुढील कारकीर्द अवलंबून आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात तो सपशेल अपयशी ठरला. दोन्ही डावांत मिळून त्याला केवळ 3 धावा करता आल्या. मात्र, असे असतानाही ऑस्ट्रेलियाने 2 दिवसांतच हा सामना 6 गडी राखून जिंकला. वॉर्नरच्या बॅटमधून शेवटचे कसोटी शतक जानेवारी 2020 मध्ये आले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील 4 डावात 5, 48, 21 व 28 धावा केल्या होत्या. त्यामुळे ही कसोटी त्याच्या कसोटी कारकिर्दीवर मोठा प्रभाव टाकू शकते.
त्याच्या या खराब कामगिरीनंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्याची कामगिरी पुढील काही सामन्यात अशीच राहिल्यास त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो असे म्हटले आहे. तर, काहींनी थेट त्याला निवृत्त होण्याचाही सल्ला दिला आहे.
मागील काही दिवसांपासून वॉर्नर आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध देखील आणले गेलेत. आपल्याला बोर्डाकडून हवा तसा पाठिंबा मिळत नसल्याचा आरोप त्याने केला होता. या सर्व प्रकरणामुळे त्याच्यावर चांगली कामगिरी करण्याचा दबाव असेल. असे न झाल्यास या मालिकेतील अखेरच्या कसोटी नंतर अथवा बॉक्सिंग डे कसोटीनंतरच त्याचा संघातील पत्ता कट होऊ शकतो.
(David Warner Future Depends On Boxing Day Test Against South Africa)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जिथं कमी तिथं आम्ही! राहुल- रोहितलाही जे जमलं नाही, ते अश्विनने करून दाखवलं; वाचा बातमी
VIDEO: सामना जिंकताच अश्विनचा एकच जल्लोष! ड्रेसिंग रूममधील विराट, राहुलची रिऍक्शन व्हायरल