ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर मागच्या काही काळापासून सतत चर्चेत राहिला आहे. 2018 मध्ये वॉर्नरसह स्टीव स्मिथ आणि कॅमरून बॅनक्रॉफ्ट यांच्यावर चेंडूशी छेडछाड केल्यामुळे बंदी घातली गेली होती. याच प्रकरणात वॉर्नवर अजीवन कर्णधारपदाची बंदी घातली गेली होती, जी अजूनही उठवली गेली नाहीये. वॉर्नर त्याच्यावरील ही बंदी उठवण्यासाठी मागच्या मोठ्या काळापासून झगडत आहे, पण यात त्याला सतत अपयशच आहे आहे. अशातच आता ऑस्ट्रेलायाच माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रिकी पाँटिंग याने मोठी प्रतिक्रिया देत वॉर्नरला सल्ला दिला आहे.
माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याला वाटते की, डेविड वॉर्नर (David Warner) याने वास्तवादी विचार केला पाहिजे आणि स्वतःच्या कसोटी कारकिर्दीकडे लक्ष दिले पाहिजे. शनिवारी (17 डिसेंबर) वॉर्नर दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी स्वस्तात बाद झाला. आफ्रिकी संघाचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याने टाकेलेल्या पहिल्याच चेंडूवर त्याने विकेट गमावली. शून्यावर धावा केल्या. यानंतर पाँटिंगकडून वॉर्नरला हा महत्वाचा सल्ला मिळाला आहे.
ऑस्ट्रेलियाला त्याच पुढच्या दोन मालिका भारत आणि इंग्लंड संघांविरुद्ध खेळायच्या आहेत. या दोन्ही देशांमध्ये वॉर्नरची सरासरी अनुक्रमे 24.25 आणि 26.04 च्या टक्के आहे. याच पार्श्वभूमीवर पाँटिंग म्हणाला की, “मला वाटते की त्याने वास्तववादी राहिले पाहिजे आणि भविष्याकडे पाहिण्याचीही गरज आहे. जसे की मी आधी म्हणालो की, त्याने शेवट (कारकिर्दीचा) असा केला पाहिजे, जसा त्याला हवा आहे. त्याला भारताचा दौरा आणि ऍशेस दौऱ्यासाठी संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे आणि नंतर त्याला शाबासकी देत संघातून निरोप दिला जावा. त्याच्या कारकिर्दीचा शेवट अशा पद्धतीने होताना पाहणे निराशाजनक असेल. अपेक्षा आहे की, त्या दिवसापर्यंत चांगले प्रदर्शन करत राहील.”
ऑस्ट्रेलिया संघाचे माजी प्रशिक्षक जस्टिन लेंगर याबाबतीत पाँटिंगच्या मताशी सहमनत नसल्याचे दिसले. लेंगर म्हणाले की, “आता सर्वजन तो शुन्यावर बाद झाला, याविषयी बोलतील. मल ऑस्ट्रेलियाला माहिती आहे की, तो किती महत्वाचा खेळाडू आहे. खासकरून दक्षिण आफ्रिका संघाच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळताना. मला देखील संघातील त्याचे महत्व चांगलेच माहिती आहे.” (David Warner gets advice from Ricky Ponting)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आयपीएल त्याच्यासाठी बनली नाहीये, तो…’ दिनेश कार्तिकने कुणाबद्दल केले भाष्य?
भारतीय संघाने सलग तिसऱ्यांदा कोरले टी20 विश्वचषकावर नाव, अंतिम सामन्यात दोन पठ्ठ्यांनी झळकावलं शतक