---Advertisement---

डेव्हिड वॉर्नरने चक्क सामनावीर पुरस्कार दिला या लहान चाहत्याला, पहा व्हिडिओ

On: गुरूवार, जून 13, 2019 12:37 PM
---Advertisement---

टाँटॉन। २०१९ विश्वचषकात काल(१२ जून) १७ वा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४१ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयात सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने शतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला. त्याच्या शतकी खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

पण हा पुरस्कार वॉर्नरने चक्क सामना पाहण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या एका लहानग्या चाहत्याला सामना संपल्यानंतर भेट दिला आहे. याचा व्हिडिओ आयसीसीने विश्वचषकाच्या ट्विटर हँडेलवर शेअर केला आहे.

या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की ‘डेव्हिड वॉर्नरने त्याचा सामनावीराचा पुरस्कार देऊन ऑस्ट्रेलियाच्या या लहान चाहत्याचा दिवस बनवला आहे.’ तसेच या व्हिडिओमध्ये आयसीसीकडून झैनाब अब्बासने या लहान चाहत्याची मुलाखत घेतलेली दिसते.

यावेळी तिने त्या लहान मुलाला विचारले वॉर्नरला भेटून आणि त्याने दिलेली भेट स्विकारुन कसे वाटत आहे, यावर तो लहान मुलगा म्हणाला, ‘मला खूप मस्त वाटत आहे.’

पुढे अब्बासने त्याला विचारले की वॉर्नर तुमच्याकडे कसा काय आला, यावर तो मुलगा म्हणाला, ‘आम्ही फक्त झेंडा फडकवत होतो आणि तो आमच्याकडे आला आणि आम्हाला हे दिले.’ त्यापुढे अब्बासने त्या लहान मुलाला वॉर्नरचा चाहता आहेस का, असे विचारल्यावर तो मुलगा म्हणाला ‘मला तो खरंच आवडतो. मला आनंद झाला ऑस्ट्रेलिया जिंकली.’

वॉर्नरने या सामन्यात १११ चेंडूत १०७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ११ चौकार आणि १ षटकार मारला. हे वॉर्नरचे या विश्वचषकातील पहिले शतक आहे.  त्याचबरोबर त्याने पहिल्या विकेटसाठी ८२ धावांची खेळी करणाऱ्या कर्णधार ऍरॉन फिंचसह १४६ धावांची भागीदारीही रचली.

या दोघांच्या खेळींमुळे ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ४९ षटकात सर्वबाद ३०७ धावा केल्या आणि पाकिस्तान समोर ३०८ धावांचे आव्हान ठेवले. तसेच पाकिस्तानकडून मोहम्मद अमिरने शानदार गोलंदाजी करताना १० षटकात ३० धावा देत सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तानकडून इमाम उल हकने ५३ धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेचमोहम्मद हाफिज(४६), कर्णधार सर्फराज अहमद(४०) आणि वहाब रियाजने(४५) धावा करताना थोडाफार संघर्ष केला.

परंतू अन्य फलंदाजांनी योग्य साथ न दिल्याने पाकिस्तानचा डाव ४५.४ षटकात २६६ धावांवर संपूष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने १० षटकात गोलंदाजी करताना ३३ धावा देत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

किंग कोहलीला आज मास्टर ब्लास्टरला मागे टाकत विश्वविक्रम करण्याची सुवर्णसंधी

धवनच्या दुखापतीबाबत फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांचा मोठा खूलासा, पंतबद्दलही केले भाष्य

स्मिथची पाठराखण करणे कोहलीला महागात, या खेळाडूने केली सडकून टीका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment