पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएल 2023च्या 64व्या सामन्यात आमने-सामने आहेत. बुधवारी (दि. 17 मे) धरमशाला येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात दिल्ली संघ नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजीस उतरला. यावेळी कर्णधार डेविड वॉर्नर याने खास विक्रमाची नोद आपल्या नावावर केली. तो अशी कामगिरी करणारा आयपीएल इतिहासातील संयुक्तरीत्या फक्त चौथाच खेळाडू ठरला. त्याने याबाबतीत रोहित शर्मा, एबी डिविलियर्स आणि ख्रिस गेल यांसारख्या दिग्गजांनाही पछाडले आहे. चला तर त्याच्या विक्रमाबद्दल जाणून घेऊयात…
डेविड वॉर्नरचा विक्रम
या सामन्यात नाणेफेक गमावत पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाकडून प्रथम फलंदाजी करतान डेविड वॉर्नर (David Warner) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांनी डावाची सुरुवात केली. यादरम्यान वॉर्नरने चौथ्या षटकातील चौथ्या चेंडूवर कागिसो रबाडा याला षटकार मारताच 16 धावा पूर्ण केल्या. त्यामुळे आयपीएल 2023 स्पर्धेत डेविड वॉर्नर 400 धावा (David Warner 400 Runs) पूर्ण करणारा फलंदाज बनला. यासोबतच त्याने आयपीएलमधील खास विक्रमही स्वत:च्या नावावर नोंदवला.
आयपीएल हंगामात सर्वाधिक वेळा 400 हून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये वॉर्नर संयुक्तरीत्या चौथ्या स्थानी पोहोचला. त्याने आतापर्यंत नऊ वेळा अशी कामगिरी केली आहे. त्याच्या आधी अशी कामगिरी करणाऱ्या फलंदाजांमध्ये संयुक्तरीत्या अव्वलस्थानी सुरेश रैना आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानी विराट कोहली आणि तिसऱ्या स्थानी शिखर धवन आहे. त्यानंतर पाचव्या स्थानी रोहित शर्मा असून त्याने अशी कामगिरी 7 वेळा केली आहे. तसेच, निवृत्ती घेणाऱ्या एबी डिविलियर्सने 6 वेळा अशी कामगिरी केली आहे. याव्यतिरिक्त सहाव्या स्थानी संयुक्तरीत्या तीन खेळाडू आहेत. त्यात केएल राहुल, ख्रिस गेल आणि गौतम गंभीर यांच्या नावाचा समावेश आहे. या तिघांनीही प्रत्येकी 5 वेळा आयपीएलच्या एका हंगामात 400हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.
सर्वाधिक वेळा आयपीएल हंगामात 400हून अधिक धावा करणारे खेळाडू
9 वेळा- सुरेश रैना
9 वेळा- विराट कोहली
9 वेळा- शिखर धवन
9 वेळा- डेविड वॉर्नर*
7 वेळा- रोहित शर्मा
6 वेळा- एबी डिविलियर्स
5 वेळा- केएल राहुल
5 वेळा- ख्रिस गेल
5 वेळा- गौतम गंभीर
या सामन्यात वॉर्नर अर्धशतक करण्यास चुकला. त्याने 31 चेंडूत 46 धावा केल्या. यामध्ये 2 षटकार आणि 5 चौकारांचाही समावेश होता. अशाप्रकारे त्याच्या आयपीएल 2023मध्ये 13 सामन्यात 430 धावा पूर्ण झाल्या आहेत. (David Warner Most IPL seasons with 400 plus runs see list)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘…तर माझा हातच कापावा लागला असता’, लखनऊच्या मॅचविनर खेळाडूचा धक्कादायक खुलासा
अखेरच्या दोन सामन्यांमध्ये दिल्ली करणार राडा, संघाकडून आली ‘ही’ सर्वात मोठी प्रतिक्रिया