ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने आगामी भारत दौरा व टी20 विश्वचषकासाठी आपल्या पंधरा सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. विश्वचषकाला आणखी दीड महिन्यापेक्षा जास्त अवधी असताना, ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने संघ निवड जाहीर करत सर्वांना धक्का दिला आहे. विश्वचषकासाठी संघात निवडलेला अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा मात्र भारताविरुद्धच्या मालिकेत खेळताना दिसणार नाही.
ऑस्ट्रेलिया निवड समितीने जाहीर केलेल्या संघात डेव्हिड वॉर्नर याचा समावेश आहे. परंतू, वॉर्नर थेट विश्वचषकात खेळताना दिसेल. त्याच्याजागी भारत दौऱ्यावर अष्टपैलू कॅमेरून ग्रीन हा दिसून येईल. वॉर्नर याला वर्कलोड मॅनेजमेंट म्हणून आराम देण्यात आल्याचे सांगितले.
या संघात प्रथमच सिंगापूरचा आक्रमक फलंदाज टीम डेव्हिड याला देखील स्थान मिळाले आहे. डेव्हिडचा जन्म सिंगापूरमध्ये झाला असला तरी, डेव्हिड ऑस्ट्रेलियन नागरिक आहे. त्यामुळे त्याला थेट विश्वचषकात संधी देत ऑस्ट्रेलियाने मोठी खेळी केली आहे. डेव्हिड हा जगभरातील टी20 लीगमध्ये खेळत असतो. त्याला आपल्या आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखले जाते.
ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर येत असून, त्यांना या दौऱ्यावर तीन टी20 सामने खेळायचे आहेत. हे सामने 20, 23 व 25 सप्टेंबर रोजी अनुक्रमे मोहली, नागपूर व हैदराबाद या शहरात खेळले जातील. भारतीय संघाची घोषणा या दौऱ्यासाठी लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. 20 सप्टेंबर रोजी भारत आपल्या विश्वचषक संघाची घोषणा करणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले गेले आहे. आगामी टी20 विश्वचषक ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर नोव्हेंबर या काळात खेळला जाईल.
टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघ-
ऍरॉन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड, मिचेल मार्श, जोस इंग्लिश, टीम डेव्हिड, मार्कस स्टॉयनिस, एश्टन एगर, ऍडम झंपा, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोस हेजलवूड, केन रिचर्डसन.
भारत दौऱ्यावर डेव्हिड वॉर्नरऐवजी कॅमेरुन ग्रीन सहभागी होईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पुन्हा एकदा सचिन करणार टीम इंडियाचे नेतृत्व! ‘या’ स्पर्धेतून करतोय कमबॅक
अल्टिमेट खो खो स्पर्धेत राजस्थान वॉरियर्सला नमवून गुजरात जायंट्सचा विजयी समारोप
सुनील पूर्णपात्रे यांची सॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी निवड