आयपीएल (IPL 2025)च्या मेगा लिलावात (Mega Auction) अनेक खेळाडू विकले गेले नाहीत. अनेक खेळाडू सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये विकले गेले नाहीत, पण शेवटी विकले गेले. या यादीत भारताचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणेच्याही (Ajinkya Rahane) नावाचा समावेश होता. पण त्याला कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) दुसऱ्या फेरीत 1.50 कोटीला आपल्या संघात सामील केले आहे. रहाणेसह मोईन अली आणि उमरान मलिक यांनादेखील केकेआरने आपल्या ताफ्यात सामील केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड वाॅर्नर (David Warner) मेगा लिलावाच्या पहिल्या फेरीतच अनसोल्ड ठरला होता, परंतु दुसऱ्या फेरीत त्याला कोणतातरी संघ घेईल अशी चाहत्यांना आशा होती, मात्र वाॅर्नर दुसऱ्या फेरीत देखील अनसोल्ड ठरला आहे. शेवटच्या आयपीएल हंगामात वाॅर्नर दिल्लीकडून खेळला होता. पण आता आगामी हंगामात तो खेळताना दिसणार नाही.
शेवटच्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळणारा पृथ्वी शाॅ (Prithvi Shaw) देखील मेगा लिलावात अनसोल्ड ठरला. तर शेवटच्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळणारा सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) देखील मेगा लिलावात अनसोल्ड ठरला होता. पण त्याला मुंबई इंडियन्सने अखेर त्याच्या मूळ किमतीत (30 लाख) आपल्या संघात सामील केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL Mega Auction; 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर लागली कोटींची बोली, ‘या’ संघातून खेळताना दिसणार
IPL Mega Auction; धाकटा भाऊ विकला गेला, पण सरफराज खान ठरला अनसोल्ड!
IPL Mega Auction; मूळ किंंमतीत देखील विकले गेले नाहीत, ‘हे’ स्टार खेळाडू