ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या येत्या द हंड्रेड स्पर्धेतून माघार घेतली आहे. याबद्दल त्याचे मॅनेजर जेम्स एर्स्किन यांनी स्पष्ट केले आहे.
ऑगस्टमध्ये ऑस्ट्रेलियाची झिम्बाब्वे विरुद्ध वनडे मालिका होणार आहे. त्यामुळे वॉर्नरने देशाकडून खेळण्यास प्राधान्य देण्यासाठी द हंड्रेड लीगमधून माघार घेतली आहे.
या लीगसाठी वॉर्रने साऊदर्न ब्रेव्ह या संघाकडून खेळण्यासाठी १२५००० युरोंचा करार केला होता. पण झिम्बाब्वे विरुद्धची वनडे मालिका या लीगच्यादरम्यानच होणार आहे. लीगला १७ जूलैपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे वॉर्नरला साऊदर्न ब्रेव्ह संघाबरोबरचा करार रद्द करावा लागला आहे.
असे असले तरी याआधीच एर्स्किन यांनी वॉर्नर आयपीएलचा १३ मोसम झाला तर खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पण सध्यातरी कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे आयपीएल२०२०ला १५ एप्रिलपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे काही वृत्तांनुसार जूलै-सप्टेंबरमध्ये हा आयपीएल मोसम होऊ शकतो.
ट्रेंडिंग घडामोडी-
–राॅस टेलर- मॅक्क्युलम या २०१२ क्रिकेट वादावर मॅक्क्युलमने प्रथमच केला मोठा खुलासा
–आधी चुकला असला तरी या ३ कारणांमुळे उनाडकटला टीम इंडियात दिली पाहिजे संधी
–यावरुन कळते गांगुली टीम इंडियासाठी किती कष्ट घेत आहे