इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनराइजर्स हैदराबादचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नरने सूर्यकुमार यादवच्या आयपीएलच्या सर्वकालिन 11 खेळाडूंंच्या संघामध्ये स्थान न दिल्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. सूर्यकुमारने काही दिवसांपूर्वीच त्याचा आयपीएलचा सर्वकालिन 11 जणांचा संघ जाहीर केला होता.
क्रिकबझशी बोलत असताना सूर्यकुमार यादवने आपला आयपीएलचा सर्वकालिन 11 खेळाडूंच्या संघाची निवड केली आहे. परंतु त्याच्या समोर एक अट अशी होती की, त्याने स्वत: ला या संघात समाविष्ट करावे आणि मुंबई इंडियन्सच्या फक्त 4 खेळाडूंची निवड तो या संघात करू शकतो.
सलामीच्या फलंदाजीसाठी सूर्यकुमारने राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलर आणि मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माची निवड केली आहे. बटलरची या संघामध्ये फलंदाजीसह यष्टीरक्षक म्हणूनही निवड झाली आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीची निवड केलेली आहे. तर चौथ्या क्रमांकासाठी सूर्यकुमारने स्वतःची निवड केली आहे. पाचव्या स्थानावर आणखी एका आरसीबीच्या खेळाडूची म्हणजेच एबी डिव्हिलियर्सची निवड केली आहे.
याशिवाय सूर्यकुमारने त्याच्या संघात अष्टपैलू हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा आणि आंद्रे रसल यांनाही स्थान दिले आहे. त्याचबरोबर फिरकीपटू म्हणून सूर्यकुमारने राशिद खानला निवडले असून वेगवान गोलंदाजांच्या फळीत त्याने मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहची निवड केली आहे.
वॉर्नरची प्रतिक्रिया
सूर्यकुमारने त्याच्या या संघात समावेश न केल्याबद्दल डेव्हिड वॉर्नर म्हणाला की, ‘सूर्यकुमारने मला या संघात माझी निवड केली नाही, यावर माझा विश्वासच बसत नाही.’ डेव्हिड वॉर्नरनी ट्वीटद्वारे ही प्रतिक्रिया दिला आहे.
Can’t believe he’s left me out 😂😂 https://t.co/6tTOFruMiR
— David Warner (@davidwarner31) July 10, 2021
सूर्यकुमार यादवचा आयपीएलचा सर्वकालिन ११ जणांचा संघ –
जोस बटलर (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एबी डिविलियर्स, हार्दिक पंड्या, आंद्रे रसल, रविंद्र जडेजा, राशिद खान, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंकेहून महत्त्वाची बातमी! यजमान संघाच्या खेळाडूंचा कोरोना अहवाल आला पुढे; जाणून घ्या रिझल्ट
क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर ‘मास्टर-ब्लास्टर’ सचिन स्वयंपाक घरात आजमावतोय हात, पाहा व्हिडिओ