ऍशेस 2023 कसोटी मालिकेतील पहिला सामना बर्मिंघम येथे खेळला गेला. अत्यंत रोमहर्षक झालेल्या या सामन्याच्या अखेरच्या दिवशी (मंगळवार 20 जून) ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 2 गडी राखून पराभव केला. या सामन्यादरम्यान इंग्लंडच्या चाहत्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बार्मी आर्मी या समूहाने ऑस्ट्रेलियन संघाला चांगलेच डिवचले होते. मात्र, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने त्या सर्व चाहत्यांना अगदी चोख प्रतिउत्तर दिले.
ऍजबस्टन येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंडचे चाहते ऑस्ट्रेलियन संघाला लक्ष करताना दिसले. ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टीव्ह स्मिथ याला या चाहत्यांनी गाणे गात डिवचलेले. हे गाणे सॅंडपेपर गेट प्रकरणाला उद्देशून होते. त्यानंतर हे प्रेक्षक ऑस्ट्रेलियाच्या अनेक खेळाडूंना सीमारेषेवर लक्ष करताना दिसले. वॉर्नर क्षेत्ररक्षण करत असताना त्यांनी त्याला देखील काही शब्द वापरले. त्यावर प्रतिक्रिया देताना वॉर्नर याने आपल्या कानाला हात लावत, काय बोलत होता? अजून मोठ्याने बोला अशा प्रकारे हावभाव करत उत्तर दिले.
https://twitter.com/AkshatOM10/status/1670819514777473025?t=il6-3_xrs6N2zUiAQSpgHA&s=19
इंग्लिश चाहत्यांचा हा गट नेहमीच विविध खेळाडूंना लक्ष करत असतो. 2021 मध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा दौरा केला असताना, त्यांनी तत्कालीन भारतीय कर्णधार विराट कोहलीला देखील असेच लक्ष केलेले. त्यावेळी विराटने देखील त्यांना याच प्रकारे प्रत्युत्तर दिले होते.
या सामन्याचा विचार केल्यास इंग्लंडने जो रूटच्या नाबाद शतकाच्या जोरावर पहिल्या दिवशी 393 धावांवर आपला डाव घोषित केलेला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने चोख प्रत्युत्तर देत ख्वाजाच्या शतकासह 386 पर्यंत मजल मारली. इंग्लंडला आपल्या दुसऱ्या डावात 273 धावा करता आल्या. विजयासाठी मिळालेले 281 धावांचे लक्ष ऑस्ट्रेलियाने 2 गडी राखून पूर्ण केले. पहिल्या डावात शतक व दुसऱ्या डावात अर्धशतक करणारा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा सामनावीर ठरला.
(David Warner Reply To England Barmy Army In Virat Kohli Style At Ashes Test)
महत्वाच्या बातम्या –
शाब्बास पोरींनो! भारतीय मुलींनी जिंकला इमर्जिंग आशिया कप, फायनलमध्येही श्रेयंका चमकली
वेंगसरकरांनी सांगितली धोनीच्या कर्णधार होण्याची इनसाईड स्टोरी! म्हणाले, “आम्हाला दिसले होते की…”