बॉल टॅम्परिंग प्रकरणात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरला सनरायजर्स हैदाराबाद संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
या अगोदर बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथलाही राजस्थान रॉयल्स संघाच्या कर्णधार पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. या प्रकरणानंतर चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या कर्णधारपदाची जबाबदारी टिम पेनकडे सोपवण्यात आली आहे.
सनरायजर्स हैदाराबादच्या नव्या कर्णधारापदि भारताच्या शिखर धवनची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात कॅमरुन बॅनक्रॉफ्टने चेंडूशी छेडछाड केली होती, यानंतर क्रिकेटविश्वात मोठे वादळ उठले होते.
बॉल टॅम्परिंग प्रकरणात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघावर मोठ्या प्रमाणात सर्व स्तरातुन टिका होत आहे. बॉल टॅम्परिंग प्रकरण डेव्हीड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमरुन बॅनक्रॉफ्ट यांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दोषी ठरवले आहे.