ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सस आणि दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यांच्यातील वाद मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. वॉर्नर 14 डिसेंपरपासून पाकिस्तानविरुद्ध मायदेशात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. त्याच्या कारक्रिदीतील ही शेवटची कसोटी मालिका असणार आहे. पण त्याआधी त्याने मिचेल जॉन्सन याला प्रत्युत्तर दिले आहे.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (AUS vs PAK) यांच्यातील या कसोटी मालिकेचा शेवटचा सामना 3 ते 7 जानेवारी यादरम्यान खेळला जाणार आहे. वॉर्नरसाठी हा कसोटी क्रिकेटमधून निरोपाचा सामना असेल. त्याच्या निवृत्तीची चर्चा आतापासूनच होत आहे. पण मिचेल जॉन्सन (Mitchell Johnson) याच्या मते वॉर्नर अशा निवृत्तीसाठी पात्र ठरत नाही. 2018 मध्ये झालेल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात डेव्हिड वॉर्नर (David Warner) याचेही नाव होते. स्टीव स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बॅनक्रॉफ्ट यांना दोषी धरले गेले होते. या तिघांवरही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कडक कारवाई केली. पण वॉर्नर त्यानंतरही थांबला नाही. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमद्ये जोरदार पुनरागमन केले आणि आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या तयारीत आहे.
असे असले तरी, मिचेल जॉन्सन याचा वॉर्नरवरील राग अद्याप कमी झाला नाहीये. माजी वेगवान गोलंदाजानेबॉल टॅम्परिंग करणाऱ्या वॉर्नरला एवढा चांगला निरोप कशासाठी? असा प्रश्न नुकताच उपस्थित गेला होता. जॉन्सच्या या टीकेकडे वॉर्नरने मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केले. वॉर्नर म्हणाला, “अशा हेडलाईन आल्याशिवाय समर क्रिकेट पूर्ण होऊ शकत नाही. असो पण जे आहे ते आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. पणयातून पुढे जाऊन, एका चांगल्या कसोटी सामन्याची आशा करत आहोत.”
वॉर्नरच्या मते जॉन्सनच्या टीकेला समोरे जाण्याच्या शक्ती त्याच्यात अधापासूनच आहे. यावेळी त्याने आई वडिलांची शिकवण देखीलसांगितली. तो म्हणाला, “माझ्या आई वडिलांनी माझ्या मनात आधीच या गोष्टी भरवल्या आहेत. त्यांनी मला दररोज लढणे आणि कठोर मेहनत घ्यायला शिकवले. आज जे पाहायला मिळत आहे, त्याचे महत्व अधिक आहे. लोकं क्रिकेटचे समर्थन करण्यासाठी पुढे येत आहेत.” (David Warner responds to Mitchell Johnson’s criticism)
महत्वाच्या बातम्या –
गंभीरशी भांडण करणं श्रीसंतला पडलं महागात! LLC कमिशनरने पाठवली लीगल नोटीस; म्हणाले, ‘जोपर्यंत तू…’
‘त्यांना रचिनची गरज…’, IPL 2024 Auctionपूर्वी इरफान पठाणचा ‘या’ संघाला मोलाचा सल्ला