---Advertisement---

‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात टीम इंडियापुढे मोठे आव्हान, ‘हा’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर दुखापतीतून बरा

On: शुक्रवार, डिसेंबर 18, 2020 9:27 AM
---Advertisement---

भारत-ऑस्ट्रेलिया संघातील बहुप्रतिक्षित बॉर्डर- गावसकर कसोटी मालिकेचा गुरुवारपासून (१७ डिसेंबर) ऍडलेड येथे श्रीगणेशा झाला. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना दिवसरात्र सामन्याच्या रूपात गुलाबी चेंडूने खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर भारतीय संघाने धावफलकावर ६ बाद २३३ धावांची नोंद केली आहे. परंतु ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर याला दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर ठेवण्यात आले आहे. आता वॉर्नरच्या दुखापतीविषयी मोठे अपडेट पुढे आले आहे.

डेविड वॉर्नरचे वक्तव्य
स्वत: डेविड वॉर्नरने आपल्या दुखापतीविषयी माहिती दिली आहे. रेडिओ नेटवर्क सेनशी बोलताना वॉर्नर म्हणाला की, “मी दुखापतीमुळे ऍडलेड येथील दिवस- रात्र कसोटी सामन्याचा भाग नाही. याचे मला खूप वाईटही वाटत आहे. कारण इतक्या मोठ्या मालिकेच्या कोणत्याही सामन्याचा भाग नसणे खूप दुर्दैवी गोष्ट आहे, असे मला वाटते. मी अपेक्षा करतो की, पहिल्या कसोटी सामन्यानंतर मी पुनरागमन करेल. सध्या मी दर ताशी १४ किलोमीटर वेगाने धावू शकत आहे. अपेक्षा करतो ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यापूर्वी मी २६-३० किलोमीटर दर ताशी वेगाने धाव घेईल.”

दुखापतीमुळे हुकली टी२० मालिका
भारतीय संघाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना वॉर्नरला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. यामुळे त्याला तो सामना अर्ध्यात सोडून मैदानाबाहेर जावे लागले होते. याच कारणामुळे वॉर्नरला भारताविरुद्धची ३ सामन्यांची टी२० मालिकाही खेळता आली नाही. परंतु २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळल्या जाणाऱ्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात तो ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्त्व करताना दिसेल.

महत्त्वाच्या बातम्या-

AUS vs IND 1st Test: आज कसोटीचा दुसरा दिवस; साहा- अश्विनची जोडी नाबाद

ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का; डेविड वॉर्नर पहिल्या कसोटीतून बाहेर; ‘हा’ खेळाडू पदार्पण करण्याची शक्यता

डेविड वॉर्नरचा हृतिक रोशनच्या अवतारातील ‘हा’ व्हिडीओ एकदा बघाच…!! तुम्हीही रोखू शकणार नाही हसू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---