इंग्लंड आणि वेल्समध्ये सध्या सुरु असलेल्या आयसीसी 2019 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याने या स्पर्धेत आत्तापर्यंत 6 सामन्यात मिळून सर्वाधिक 447 धावा केल्या आहेत.
पण त्याच्या या कामगिरीबरोबरच तो काही दिवसांपूर्वी जयकिशन प्लाहा या भारतीय वंशाच्या ब्रिटीश गोलंदाजाच्या डोक्याला त्याने मारलेला चेंडू लागल्याने चर्चेत आला होता.
जयकिशनला 8 जूनला ऑस्ट्रेलिया संघाच्या सराव सत्रात डेव्हिड वॉर्नरने मारलेला एक चेंडू डोक्याला लागला होता. त्यानंतर जयकिशन जमिनीवर कोसळला होता. त्याला खाली पडलेले पाहुन लगेचच वैद्यकीय टीमने मैदानावर येऊन त्याच्यावर उपचार केले होते.
3 दिवस जयकिशन हॉस्पिटलमध्ये होता. त्याचे सीटी स्कॅन करण्यात आले होते. त्यानंतर त्याला कोणतीही गंभीर इजा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यानंतर वॉर्नरने जयकिशनला द ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका संघात 15 जूनला झालेल्या सामन्यात आमंत्रण दिले होते. यावेळी त्याने जयकिशनला ऑस्ट्रेलियाची स्वाक्षरी केलेली जर्सी भेट दिली होती.
या घटनांबद्दल जयकिशनने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की ‘मी खेळपट्टीवर पडण्याआधी वॉर्नरला ‘ओह लॉर्ड, नो’ असे दुसऱ्या एन्डवरुन ओरडताना ऐकले. तो ऑफसाईड ऑफचा चेंडू होता. वॉर्नरने शॉर्ट फटका खेळला आणि तो चेंडू वेगाने माझ्या दिशेने आला. मी हालण्याच्या आधीच तो चेंडू मला जोरात लागला.’
तसेच जयकिशन पुढे म्हणाला, ‘वॉर्नर, लँगर, मॅक्सवेल, स्मिथ, तसेच काही जण मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आले होते. कदाचीत काही वर्षांपूर्वी झालेल्या घटनेमुळे(फिल ह्यूजचे 2014 मध्ये डोक्याला चेंडू लागल्याने निधन झाले होते.) असे झाले असावे. वॉर्नर मला म्हणाला, ‘बिग मॅन, मला माफ कर.’ आणि त्याने मला मिठी मारली.’
त्याचबरोबर वॉर्नरने जर्सी भेट दिल्याबद्दल जयकिशन म्हणाला, ‘वॉर्नरने मला बोलावले आणि मला ऑस्ट्रेलियाची जर्सी भेट दिली. या जर्सीवर ऑस्ट्रेलिया संघात असणाऱ्या सर्वांच्या स्वाक्षरी आहेत. मी खूप आनंदी आहे. वॉर्नरने माझ्या कुटुंबाला विश्वचषकाचे काही तिकीटे भेट दिली.’
याबरोबरच जयकिशन विराट कोहली, एमएस धोनी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार अशा भारतीय क्रिकेटपटूंनाही भेटला असल्याचे त्याने सांगितले.
Last week, Jaykishan Plaha was hit on the head by a David Warner drive during an Australia training session.
Today, Warner met both Jaykishan and his mum before play, presented Jaykishan with an Australia shirt and wished him a speedy recovery 👏 ✊ pic.twitter.com/ZNrqnFuuau
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 15, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–आयसीसीने सौम्य सरकारची केली ख्रिस्तियानो रोनाल्डोशी तुलना, चाहत्यांनी असे केले ट्रोल
–धवनच नाही तर हे खेळाडूही झाले आहेत विश्वचषक २०१९ मधून बाहेर
–न्यूझीलंडच्या या खेळाडूने कर्णधार विलियम्सनला केले ट्रोल, जाणून घ्या कारण